ETV Bharat / state

अमळनेरमध्ये आणखी 14 कोरोनाबाधित रुग्ण; पाच दिवस तालुका राहणार बंद

author img

By

Published : May 8, 2020, 12:35 PM IST

अमळनेर येथे स्वॅब घेतलेल्या 78 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुने तपासणी अहवाल शुक्रवारी सकाळी जिल्हा रुग्णालय प्रशासनाला मिळाले. यापैकी 64 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून 14 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. पॉझिटिव्ह आढळलेले सर्व रुग्ण हे अमळनेर शहरातील आहेत. जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोना बाधित रुणांची संख्या 114 इतकी झाली असून त्यापैकी 16 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 2 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

corona Positive
कोरोना पॉझिटिव्ह

जळगाव - जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग आता वेगाने वाढू लागला आहे. जिल्ह्यातील अमळनेरात आणखी 14 कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील बाधितांची संख्या 114 झाली आहे. कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या अमळनेरात झपाट्याने रूग्ण संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण पडतो आहे.

अमळनेर येथे स्वॅब घेतलेल्या 78 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुने तपासणी अहवाल शुक्रवारी सकाळी जिल्हा रुग्णालय प्रशासनाला मिळाले. यापैकी 64 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून 14 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. पॉझिटिव्ह आढळलेले सर्व रुग्ण हे अमळनेर शहरातील आहेत. जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोना बाधित रुणांची संख्या 114 इतकी झाली असून त्यापैकी 16 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 2 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

अमळनेर शहरात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याचे पहायला मिळत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अमळनेर शहरासह तालुक्यात पाच दिवसांचा कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. मात्र, तरीही सातत्याने कोरोनाचे रूग्ण आढळत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जळगाव महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना रुग्ण -
पॉझिटिव्ह-12
मृत्यू-2
बरे झालेले-1

जळगाव ग्रामीण क्षेत्र
पॉझिटिव्ह-5
मृत्यू-1
बरे झालेले-1

जळगाव शहरी क्षेत्र (अमळनेर,भुसावळ,पाचोरा)
पॉझिटिव्ह-96
मृत्यू-13

जळगाव जिल्ह्याबाहेरील
पॉझिटिव्ह-1

संपूर्ण जळगाव जिल्हा
एकूण पॉझिटिव्ह-114
एकूण मृत्यू-16
बरे झालेले-2
सद्यस्थितीत उपचार घेणारे रुग्ण-96

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.