ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा 174 वर, आज 11 रुग्णांची भर - जळगावमधील कोरोना

जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकडेवारीत सातत्याने वाढ होत आहे. जिल्हा प्रशासनाला आज (ता. 10) सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात आणखी 11 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा 174 वर पोहचला आहे.

corona
प्रातिनिधी छायाचित्र
author img

By

Published : May 10, 2020, 10:56 AM IST

जळगाव - जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकडेवारीत सातत्याने वाढ होत आहे. जिल्हा प्रशासनाला आज (ता. 10) सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात आणखी 11 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा 174 वर पोहचला आहे. बाधितांच्या संख्येची द्विशतकी वाटचाल सुरू असून, प्रशासनाच्या अडचणी वाढल्या आहेत. कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर देखील मोठा ताण पडत आहे.

जळगाव, अमळनेर, भुसावळ येथे स्वॅब घेण्यात आलेल्या 70 कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहेत. यापैकी 59 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहे. 11 व्यक्तींचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये अमळनेर येथील एक 58 वर्षीय महिला, भुसावळ येथील चार पुरुषांचा तर जळगाव शहरातील पवननगर व इतर भागातील 6 महिला व 46 व 70 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 174 वर पोहोचली आहे. यापैकी 20 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर 3 व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

दरम्यान, जळगाव शहरही आता कोरोनाचे 'हॉटस्पॉट' ठरले असून येथील रुग्णसंख्या वाढतच आहे. रविवारी शहरातील 6 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने बाधितांची एकूण संख्या 22 झाली आहे. पाचोरा शहरातही रात्री उशिरा 3 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते.

हेही वाचा - 'प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अमळनेरातील परिस्थिती हाताबाहेर'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.