जळगाव - थकीत वेतन आणि इतर प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी सोमवारी राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन सुरू झाले. तर याच दरम्यान, जळगाव आगारात वाहक म्हणून सेवारत असलेल्या एका कर्मचाऱ्याने आर्थिक विवंचनेतून आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी सोमवारी दुपारी काम बंद आंदोलन केले. दोन तास सुरू असलेल्या या आंदोलनामुळे एसटीच्या सुमारे १०० फेऱ्या विस्कळीत झाल्या आहेत.
एसटी कर्मचारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात काही प्रमाणात एसटीची वाहतूक बंद होती. मात्र, कर्मचारी अत्यावश्यक सेवा पूरवण्याचे काम करत होते. मात्र, दिवाळी तोंडावर असतानाही कोरोनाै काळातील त्यांचे पगार थकवले होते. त्यातच आर्थिक अडचणीत आलेल्या एसटीच्या एका वाहकाने शिवसेनेला जबाबदार धरत आत्महत्या केली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी सोमवारी दुपारी बारा वाजल्यापासून कामबंद आंदोलनाचा पावित्रा घेत एसटी रोखून धरल्यात. जोपर्यंत वेतनाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत काम न करण्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली होती.
वेतनाचा तिढा सोडविण्याचे आश्वासन
कर्मचाऱ्यांनी स्वंयस्फुर्तीने केलेल्या या आंदोलनास ईंटक, महाराष्ट्र सटी कर्मचारी संघटना व एसटी कामागार सेनेने देखील पाठींबा देत संघटनांचे पदाधिकारी देखील सहभागी झालेत. संदिप सुर्यवंशी, नरेंद्रसिंह राजपूत व गोपाळ पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन दुपारी ४:३० वाजेपर्यंत सुरु होते. त्यानतंर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दुरध्वनीवरुन परिवहन मंत्री यांच्या स्वीय सहाय्यक व महामंडळाचे मुबंईचे अधिकारी यांच्या संपर्क केला. त्यांनी लवकरात लवकर वेतनाचा तिढा सोडविण्याचे आश्वासन दिल्यानतंर कामबंद आंदोलन मागे घेण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या या दोन तासांच्या आंदोलनामुळे जळगाव आगारातील एसटीच्या १०० फेऱ्या विस्कळीत झाल्या होत्या.
जळगावात संतप्त एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन; एसटीच्या १०० फेऱ्या विस्कळीत - एसटी कर्मचारी पगार प्रश्न
ळगाव आगारात वाहक म्हणून सेवारत असलेल्या एका कर्मचाऱ्याने आर्थिक विवंचनेतून आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी सोमवारी दुपारी काम बंद आंदोलन केले. या आंदोलनामुळे एसटीच्या सुमारे १०० फेऱ्या विस्कळीत झाल्या आहेत.