जळगाव - मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळाकडून कल्याण ते कसारा मार्गावर टिटवाळा येथे पादचारी पुलाच्या गर्डरचे (आधाराचे खांब) काम करण्यात येणार आहे. या कामासाठी मेगा ब्लॉक घेण्यात आल्याने अप आणि डाऊन मार्गावरील मुंबई-भुसावळ पॅसेंजरसह १० गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. इतर पाच गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. १३ आणि १४ मार्चला रात्री २ ते सकाळी ६ वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून भूसावळ रेल्वे जंक्शन वर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.
रद्द करण्यात आलेल्या गाड्या -
- गाडी क्रमांक १७६१२ डाउन मुंबई-नांदेड राज्य राणी एक्स्प्रेस १४ मार्च
- गाडी क्रमांक १७६११ अप नांदेड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस १३ मार्च
- गाडी क्रमांक १२११७ अप मनमाड-लोकमान्य टिळक टर्मिनस गोदावरी एक्स्प्रेस १४ मार्च
- गाडी क्रमांक १२११८ डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस-मनमाड गोदावरी एक्स्प्रेस १४ मार्च
- गाडी क्रमांक १२११२ अप अमरावती-मुंबई एक्स्प्रेस १३ मार्च
- गाडी क्रमांक १२१११ डाउन मुंबई-अमरावती एक्स्प्रेस १४ मार्च
- गाडी क्रमांक ११४०२ अप नागपूर-मुंबई एक्स्प्रेस १३ मार्च
- गाडी क्रमांक ११४०१ डाउन मुंबई-नागपूर एक्स्प्रेस १४ मार्च
- गाडी क्रमांक ५११५४ अप भुसावळ-मुंबई पॅसेंजर १३ मार्च
- गाडी क्रमांक ५११५३ डाउन मुंबई-भुसावळ पॅसेंजर १४ मार्च
गाडी क्रमांक ११०६२ अप मुजफ्फरपूर-लोकमान्य टिळक टर्मिनल एक्स्प्रेस १२ मार्चला जळगाव-वसई मार्गाने गेली. गाडी क्रमांक ११०५८ अप अमृतसर-लोकमान्य टिळक टर्मिनल एक्स्प्रेस १२ मार्चला मनमाड-दौंड मार्गे गेली. गाडी क्रमांक १२५४१ अप गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनल एक्स्प्रेस १२ मार्चला जळगाव-वसई मार्गाने गेली. गाडी क्रमांक ११०१६ अप गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनल एक्स्प्रेस १२ मार्चला मनमाड-दौंडमार्गे गेली. गाडी क्रमांक ११०२५ अप भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस १४ मार्चला मनमाड-दौंड या मार्गे जाईल.