ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्याचा दहावीचा निकाल ७६.९२ टक्के, नाशिक विभागात तिसरा क्रमांक - student

नाशिक विभागात जळगाव जिल्हा यामध्येही तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये केवळ एकच विद्यार्थी हा विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाला. तर १३ विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत, २१ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ६०४ विद्यार्थी हे तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या निकालातही नाशिक विभागात नाशिक जिल्हा ३७.२७ टक्क्यांसह अव्वलस्थानी आहे.

जळगाव जिल्ह्याचा दहावीचा निकाल
author img

By

Published : Jun 8, 2019, 5:13 PM IST

जळगाव - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च महिन्यात दहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्या परीक्षेचा निकाल आज दुपारी १ वाजता मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन जाहीर करण्यात आला. त्यात जळगाव जिल्ह्याचा निकाल ७६.९२ टक्के लागला आहे. नाशिक विभागात जळगाव जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे.

जळगाव जिल्ह्याचा दहावीचा निकाल

नाशिक विभागाचा एकूण निकाल ७७.५८ टक्के इतका लागला असून त्यात नाशिक जिल्हा ७८.८६ टक्क्यांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर धुळे ७७.११ टक्क्यांसह दुसऱ्या तर जळगाव ७६.९२ टक्क्यांसह तिसऱ्या स्थानी राहिला. आदिवासी जिल्हा म्हणून परिचित असलेला नंदुरबार सर्वात कमी म्हणजे ७४.४४ टक्क्यांसह चौथ्या क्रमांकावर आहे. जळगाव जिल्ह्यातून यावर्षी ६० हजार ९५८ विद्यार्थ्यांची दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी झाली होती. त्यापैकी ६० हजार १२३ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले होते. यातून ४६ हजार २४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ११ हजार ५६० विद्यार्थी हे विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. तर २० हजार ४६० विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत, १२ हजार ५९९ द्वितीय श्रेणीत तर १ हजार ६२९ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा निकाल ३३.८८ टक्के -

जळगाव जिल्ह्यातील १ हजार ९०३ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १ हजार ८८६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. १७ विद्यार्थी अनुउपस्थित राहिले. ६३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्ह्याचा निकाल अवघा ३३.८८ टक्के लागला आहे. नाशिक विभागात जळगाव जिल्हा यामध्येही तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये केवळ एकच विद्यार्थी हा विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाला. तर १३ विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत, २१ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ६०४ विद्यार्थी हे तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या निकालातही नाशिक विभागात नाशिक जिल्हा ३७.२७ टक्क्यांसह अव्वलस्थानी आहे. तर धुळे ३५.०७ टक्क्यांसह दुसऱ्या, जळगाव ३३.८८ टक्क्यांसह तिसऱ्या तर नंदुरबार जिल्हा ३०.४५ टक्क्यांसह चौथ्या क्रमांकावर आहे.

जळगाव जिल्ह्यात सावित्रीच्या लेकीच हुशार -

जळगाव जिल्ह्याचा एकूण निकाल ७६.९२ टक्के इतका लागला असून या निकालात पुन्हा एकदा मुलांपेक्षा मुलीच हुशार असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्याच्या निकालात मुलींच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८२.३६ इतकी आहे तर मुलांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी मुलींपेक्षा कमी म्हणजे ७२.८८ टक्के इतकी आहे. जिल्ह्यातून ३४ हजार ४६५ मुले तर २५ हजार ६५८ मुली परीक्षेसाठी प्रविष्ठ झाल्या होत्या. त्यापैकी २५ हजार ११७ मुले तर २१ हजार १३१ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. त्याचप्रमाणे पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या निकालात मुलींच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ४३.३३ टक्के तर मुलांची टक्केवारी ३१.६५ टक्के इतकी आहे.

Intro:Please use file photo for this news

जळगाव
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी 1 वाजता मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन जाहीर करण्यात आला. त्यात जळगाव जिल्ह्याचा निकाल 76.92 टक्के लागला असून जिल्हा नाशिक विभागात तिसऱ्या क्रमांकावर आहे.Body:नाशिक विभागाचा एकूण निकाल 77.58 टक्के इतका लागला असून त्यात नाशिक जिल्हा 78.86 टक्क्यांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर धुळे 77.11 टक्क्यांसह दुसऱ्या, जळगाव 76.92 टक्क्यांसह तिसऱ्या आणि आदिवासीबहुल असलेला नंदुरबार जिल्हा सर्वात कमी म्हणजे 74.44 टक्क्यांसह चौथ्या क्रमांकावर आहे. जळगाव जिल्ह्यातून यावर्षी 60 हजार 958 विद्यार्थ्यांची दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी झाली होती. त्यापैकी 60 हजार 123 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले होते. यातून 46 हजार 248 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 11 हजार 560 विद्यार्थी हे विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. तर 20 हजार 460 विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत, 12 हजार 599 द्वितीय श्रेणीत तर 1 हजार 629 विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा निकाल 33.88 टक्के-

जळगाव जिल्ह्यातील 1 हजार 903 पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 1 हजार 886 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातून अवघे 639 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्ह्याचा निकाल अवघा 33.88 टक्के लागला आहे. नाशिक विभागात जिल्हा येथेही तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये केवळ एकच विद्यार्थी हा विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाला. तर 13 विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत, 21 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर 604 विद्यार्थी हे तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या निकालातही नाशिक विभागात नाशिक जिल्हा 37.27 टक्क्यांसह अव्वलस्थानी आहे. तर धुळे 35.07 टक्क्यांसह दुसऱ्या, जळगाव 33.88 टक्क्यांसह तिसऱ्या तर नंदुरबार जिल्हा 30.45 टक्क्यांसह चौथ्या क्रमांकावर आहे.Conclusion:जळगाव जिल्ह्यात सावित्रीच्या लेकीच हुशार-

जळगाव जिल्ह्याचा एकूण निकाल 76.92 टक्के इतका लागला असून या निकालात पुन्हा एकदा मुलांपेक्षा मुलीच हुशार असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्याच्या निकालात मुलींच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 82.36 इतकी आहे तर मुलांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी मुलींपेक्षा कमी म्हणजे 72.88 टक्के इतकी आहे. जिल्ह्यातून 34 हजार 465 मुले तर 25 हजार 658 मुली परीक्षेसाठी प्रविष्ठ झाल्या होत्या. त्यापैकी 25 हजार 117 मुले तर 21 हजार 131 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. त्याचप्रमाणे पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या निकालात मुलींच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 43.33 टक्के तर मुलांची टक्केवारी 31.65 टक्के इतकी आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.