हिंगोली - जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा दाखल झाली. युवक काँग्रेस आणि काँग्रेसच्या विद्यार्थी संघटने (एनएसयुआय) च्यावतीने मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. काळे झेंडे दाखवून कार्यकर्त्यांनी पलायन केले.
हिंगोलीत युवक काँग्रेस व काँग्रेस विद्यार्थी संघटनेकडून मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे
हिंगोली जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा दाखल झाली. युवक काँग्रेस आणि काँग्रेसच्या विद्यार्थी संघटने (एनएसयुआय) च्यावतीने मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. काळे झेंडे दाखवून कार्यकर्त्यांनी पलायन केले.
मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवताना कार्यकर्त्ये
हिंगोली - जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा दाखल झाली. युवक काँग्रेस आणि काँग्रेसच्या विद्यार्थी संघटने (एनएसयुआय) च्यावतीने मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. काळे झेंडे दाखवून कार्यकर्त्यांनी पलायन केले.
Intro:आज हिंगोली येथे महाजनादेश यात्रा दाखल होणार असल्याने पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. एवढेच नव्हे तर खबरदारी म्हणून अनेक आंदोलकांना ओंढा, हिंगोली पोलीस ठाण्यात नजर कैदेत ठेवण्यात आले होते. मात्र जे नको व्हायला पाहिजे तेच अखेर यात्रेदरम्यान घडले. चक्क मुख्यमंत्र्याची यात्रा शहरात पोहोचते न पोहोचते तोच युवक काँग्रेस आणि एनएसयुआय विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविले अन कार्यकर्त्यांनी पलायनही केले.
Body:हिंगोली शहरात पोलीस प्रशासनाच्या वतीने एवढा बंदोबस्त ठेवला होता की, पोलीस अधिकारी व कर्मचारी देखील लहान सहान हालचालीवर लक्ष ठेऊन होते. ओळखपत्र असल्या शिवाय तर मान्यवरांना व काही निमंत्रिताना सभा ठिकाणी देखील जाऊ दिले जात नव्हते. मात्र मुख्यमंत्री जवळा बाजार येथील सभा संपवून हिंगोली शहरात त्यांची यात्रा दाखल होते न होते तोच त्यांना विविध मागण्यासाठी काळे झेंडे दाखवून कार्यकर्त्यांनी पलायन केले.
या कारणास्तव दाखवले होते झेंडे
सध्या मराठवाड्यातील शेतकरी हा निसर्गा समोर हतबल झाला असून, दिवसेंदिवस त्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढतच चालला आहे. जरी हे सरकार कर्ज माफी झाल्याची घोषणा करीत असले तरीही मुळात कर्ज माफी ही झाली नाही. त्यातच बेरोजगारी देखील वाढली आहे. मात्र सरकार रोजगार उपलब्ध करून देण्याची घोषणा करत आहे. शिवाय पीक विमा तर कंपन्यांची भरती करण्यासाठीच आहे. नाही कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही, तर शिक्षकाची भरती देखील केली नाही.
Conclusion:अशा असंख्य प्रश्नामुळे युवक कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या महाजादेश यात्रेला काळे झेंडे दाखविले. मात्र झेंडे दाखविलेले कार्यकर्ते ताब्यात घेण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना पळता भुई थोडी झाली होती. तर विविध पोलीस ठाण्यात, नजर कैदेत ठेवलेल्या कार्यकर्त्यांच्या आशेवर पाणीच फिरले. मात्र एवढा पोलीस बंदोबस्त असतानाही कार्यकर्त्यांनी झेंडे दाखविल्याने चांगलीच चर्चा रंगत आहे.
व्हिज्युअल ftp केले आहेत. बातमीत वापरणे.