ETV Bharat / state

पूरस्थितीत अनेकांना वाचवणाऱ्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू - hingoli youth death

पुराच्या पाण्यात कोणी अडकले किंवा वाहून जात आहे अशी माहिती मिळताच धावून जाणाऱ्या मित्र मंडळात सहभागी झालेल्या एका तरुणाचा आज पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला.

young death
young death
author img

By

Published : Sep 8, 2021, 6:08 PM IST

हिंगोली - पुराच्या पाण्यात कोणी अडकले किंवा वाहून जात आहे अशी माहिती मिळताच धावून जाणाऱ्या मित्र मंडळात सहभागी झालेल्या एका तरुणाचा आज पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. त्याचा मृतदेह उसाच्या फडात सापडला. लखन प्रकाश गजभारे ( वय -२३ रा. येलकी ता. कळमनुरी) असे मृत तरुणाचे नाव आहे.

हेही वाचा - बेळगावमध्ये मराठी माणसाचा विजय तर संजय राऊत यांच्या अहंकाराचा पराभव - फडणवीस

पुरातून वाहून जाणाऱ्यांना अनेकवेळा लखनने वाचवले आहे. परिसरात मदतीसाठी त्याने मित्रमंडळ देखील तयार केले आहे. पुराच्या पाण्यात कोणी वाहून गेल्याची माहिती मिळताच हे मित्रमंडळ घटनास्थळी धाव घेऊन ताबडतोब मदत करतात. कळमनुरी तालुक्यातील येलकी येथे गावाजवळच असलेल्या ओढ्यात वाहून गेल्याने लखनचा मृत्यू झाला आहे. सदरील ओढ्याची उंची अतिशय कमी असल्याने यामध्ये वारंवार वाहून जाण्याच्या घटना घडतात. येलकी येथील ग्रामस्थांना हाच रस्ता असल्याने यावरूनच ये-जा करावी लागते. तसेच याच ओढ्यावरूनच बाळापूर येथे ये - जा करावी लागते.

500 लोकांना जीवदान देणारा मसीहा -

लखन हा गेल्या अनेक वर्षांपासून पूरस्थितीत बचावकार्य करत आहे. हे कार्य पाहून त्याचा परिसरात अनेक ठिकाणी सत्कार देखील झाला आहे. आतापर्यंत लखन याने 500 पेक्षा अधिक लोकांना पुरातून वाचवून जीवदान दिले आहे. त्यामुळे त्याला परिसरात मसीहा देखील म्हटले जाते. आता हा मसीहाच आपल्यातून गेल्याची खंत मित्र मंडळ व ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे. अवघ्या पाच दिवसात पाण्यात बुडून मृत्यूच्या पाच घटना घडल्या आहेत.

हेही वाचा - पोर्नोग्राफी प्रकरण : अभिनेत्री गहना वशिष्ठचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.