ETV Bharat / state

तब्बल 15 वर्षांपासून चुकीची दिशा दाखवणारा फलक वाहतूक शाखेने हटवला

author img

By

Published : Jan 30, 2020, 8:36 AM IST

शहरापासून जवळच असलेल्या अकोला-नांदेड महामार्गावरील अकोला बायपास नावाने एक चौक प्रसिद्ध आहे. या चौकातून नेहमीच वाहनांची नेहमीच वर्दळ असते. विशेष म्हणजे याच महामार्गावर उत्तर भारतातून दक्षिण भारतात अवजड वाहनांची ये-जा सुरू राहते. या चौकात वाहनांना दिशा दाखविण्यासाठी बसविण्यात आलेला दिशा दर्शक फलक चुकीच्या दिशा दर्शवत होता.

wrong sign board removed by city police in hingoli
तब्बल 15 वर्षांपासून चुकीची दिशा दाखवणारा फलक वाहतूक शाखेने हटवला

हिंगोली - शहरात तब्बल 15 वर्षांपासून बसविलेला दिशादर्शक फलक वाहतूक शाखेकडून हटविण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा फलक डावीकडे असलेला रस्ता दाखविण्याऐवजी रस्ताच नसलेल्या उजव्या बाजूकडे दिशा दाखवत होता. इतके वर्ष होऊनही हा फलक कोणाच्या लक्षात का आला नसेल, याबद्दल आता चांगलीच चर्चा रंगत आहे.

शहरापासून जवळच असलेल्या अकोला-नांदेड महामार्गावरील अकोला बायपास नावाने एक चौक प्रसिद्ध आहे. या चौकातून नेहमीच वाहनांची नेहमीच वर्दळ असते. विशेष म्हणजे याच महामार्गावर उत्तर भारतातून दक्षिण भारतात अवजड वाहनांची ये-जा सुरू राहते. या चौकात वाहनांना दिशा दाखविण्यासाठी बसविण्यात आलेला दिशा दर्शक फलक चुकीच्या दिशा दर्शवत होता. अकोला बायपास येथे नेहमीच अपघाताच्या घटना घडत असल्याने त्या ठिकाणी गतीरोधक बसविण्यासाठी आज वाहतूक शाखेचे सपोनि ओंमकांत चिंचोळकर हे घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यामुळे त्यांच्या हा प्रकार लक्षात आला.

हेही वाचा - पुणा नाईट हायस्कूलचा अभिनव उपक्रम; गरजू विद्यार्थ्यांसाठी 'सायकल बँक'

दरवर्षी या फलकाची रंगरंगोटी केली जाते. तसेच या रस्त्यावर अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांची देखील ये-जा सुरु असते. चुकीचा फलक दिसताच सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी तत्काळ कर्मचारी पाठवला. तसेच तो फलक काढून घेतला. मात्र, गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून चुकीच्या दिशादर्शक फलकामुळे कित्येक वाहन चालकांना त्रास झाला असेल? तसेच किती अपघाताच्या घटना घडल्या असाव्यात आणि याला जबाबदार कोण, हा सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच अकोला ते नांदेड महामार्गावर अनेक ठिकाणचे दिशादर्शक फलक हे गायब झाले आहेत. तर काही ठिकाणी झाडांच्या विळख्यात सापडलेले आहेत, त्याकडेही सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

Intro:

हिंगोली- परराज्यातील वाहनांना पुढील दिशा कळवावी किंवा रस्ता समजावा यासाठी राष्ट्रीय महामार्गावर दिशा दर्शक फलक लावले जातात. कधी कधी तर हे फलक झाडांच्या विळख्यात सापडतात मात्र हिंगोली शहरात 15 वर्षांपासून बसविलेला दिशादर्शक फकल डावीकडे असलेला रस्ता दाखविण्याऐवजी रस्ताच नसलेल्या उजव्या बाजूकडे वळण रस्ता असलेला दाखवत होता. तो आज वाहतूक शाखेच्या वतीने हटवण्यात आलाय. एवढे वर्ष होऊन ही हा फलक कोणाच्या लक्षात का आला नसेल, याबद्दल आता चांगलीच चर्चा रंगत आहे.

Body:हिंगोली शहरापासून जवळच असलेल्या अकोला- नांदेड महामार्गावरील अकोला बायपास नावाने एक चोक प्रसिद्ध आहे. या चोकातून नेहमीच वाहनांची नेहमीच वर्दळ असते.विशेष म्हणजे याच महामार्गावर उत्तर भारतातून दक्षिण भारतात अवजड वाहनांची येजा सुरू राहते. मात्र याच चोकात वाहनांना दिशा दाखविण्यासाठी बसविण्यात आलेला दिशा दर्शक फलक चुकीच्या दिशा दर्शवत होता. अकोला बायपास येथे नेहमीच अपघाताच्या घटना घडत असल्याने, त्या ठिकाणी गती रोधक बसविण्यासाठी आज वाहतूक शाखेचे सपोनि ओंमकांत चिंचोळकर हे घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यामुळे त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. दर वर्षीच या फलकाची रंगरंगोटी केली जातेय, तसेच या रस्त्यावर अनेक अधिकारी- कर्मचाऱ्याची देखील ये - जा सुरू असून ही चुकीची दिशा दाखविणारा फलक कुणाच्या ही लक्षात आला कसा नसेल? याचाच आता या ठिकाणी विचार केला जातोय. चुकीचा फलक दिसताच सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता, साबाने तात्काळ कर्मचारी पाठवून तो फलक काढून घेतला. मात्र गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून चुकीच्या दिशादर्शक फलकामुळेे कित्येक वाहन चालकांना त्रास झाला असेल? तसेच किती अपघाताच्या घटना घडल्या असाव्यात अन याला जबाबदार कोण? हा सवाल उपस्थित केला जातोय. Conclusion:मात्र आज दिवसभर हा फलक चांगलाच चर्चेत आला होता. तसेच अकोला ते नांदेड महामार्गावर अनेक ठिकाणचे दिशादर्शक फलक हे गायब झालेत तर काही ठिकाणी झाडांच्या विळख्यात सापडलेले आहेत त्याकडे देखील साबाने लक्ष देण्याची गरज आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.