ETV Bharat / state

महिला पोलिसावर ६ वर्षांपासून लैंगिक अत्याचार; आरोपीविरोधात गुन्हा दाखल - हिंगोली लैंगिक अत्याचार प्रकरण

पीडिता लग्नाची मागणी करीत असताना आरोपीने तिच्याबाबत जातीवाचक टिप्पणी केली. त्यामुळे पीडितेने हिंगोली शहर पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

६ वर्षांपासून लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीविरोधात गुन्हा दाखल

author img

By

Published : Oct 24, 2020, 7:29 PM IST

हिंगोली - एका महिला पोलिसाला लग्नाचे आमिष दाखवून 6 वर्षांपासून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडिता लग्नाची मागणी करीत असताना आरोपीने तिच्याबाबत जातीवाचक टिप्पणी केली. त्यामुळे पीडितेने हिंगोली शहर पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

केशव दत्ता धाडवे (30, रा. लिंबी ता. हिंगोली) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने पीडितेसोबत ओळख वाढवून तिला लग्नाचे आमिष दाखवून प्रेमात पडले. आरोपीने 1 एप्रिल 2014 ते 3 सप्टेंबर 2020 दरम्यान हिंगोली शहरातील सरस्वती नगर, नवीन पोलीस वसाहत येथे नेऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. पीडितेने जेव्हा आरोपीकडे लग्नाची मागणी केली तेव्हा, आरोपीने पीडितेला जातीवाचक शिवीगाळ करत लग्नास नकार दिला. तसेच जीवे मारण्याची धमकी देखील दिली, असा आरोप पीडितेने केला आहे.

या संपूर्ण प्रकाराने घाबरून गेल्यानंतर पीडितेने हिंगोली शहर पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणात आरोपीविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीवरून अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.