हिंगोली- कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून राज्यभरात लाॅकडाऊन लागू करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान कमी म्हणून की काय, वन्य प्राण्यांचाही सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. वन्य प्राण्यांनी धुकाकुळ घातला असून पिकांची मोठी नासधुस होत आहे.
जिल्ह्यातील शेतशिवारात मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांचे कळप दाखल झालेले आहेत. रोही, नीलगाय, हरीण, डुक्कर शेतामध्ये रात्री-अपरात्री शिरुन, पिकांचे नुकसान करीत आहेत. निसर्गाच्या अवकृपेने शेतकरी अगोदरच अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. वन्यप्राण्यांपासून शेतीचा बचाव करण्यासाठी शेतकरी रात्री शेतामध्ये मुक्कामासाठी जात आहेत.
शेतकऱ्यांवर वन्यप्राण्यांचे संकट भारी पडत आहे. वन्य प्राण्यांच्या या कळपात शंभर ते दीडशे रोही हरण आहेत. ते कळपाने फिरत असल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे वन विभागाने या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त लावावा, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.
हेही वाचा- राजगृह हल्ला प्रकरणाची सीआयडी चौकशी करा; रामदास आठवलेंची मागणी