ETV Bharat / state

जागतिक जलदिनीच हिंगोलीत पाण्याचा अपव्यय; तर दुसरीकडे जलदिंडीचे आयोजन

author img

By

Published : Mar 22, 2019, 11:14 PM IST

दरवर्षी प्रमाणे हिंगोली जिल्हा तीव्र पाणीटंचाईमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जागतिक जलदिनी चक्क जिल्हाधिकारी कार्यालयात माती मुरविण्यासाठी पाण्याचा अपव्यय होतोय, तर दुसरीकडे मात्र, पाणी वाचविण्यासाठी जलदिंडी रॅली काढली जातेय

पाणी टंचाईच्या तोंडावरील हिंगोलीतील विरोधाभासी चित्र

हिंगोली - जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट नवे नाही. दरवर्षी प्रमाणे हिंगोली जिल्हा तीव्र पाणीटंचाईमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चालू वर्षी जिल्ह्यातील सर्वच तलाव कोरडे ठाक पडल्यात जमा आहेत. त्यातच जागतिक जलदिनी चक्क जिल्हाधिकारी कार्यालयात माती मुरवण्यासाठी पाण्याचा अपव्यय होतोय, तर दुसरीकडे मात्र, पाणी वाचविण्यासाठी जलदिंडी रॅली काढली जातेय, असे विरोधाभासी चित्र दिसून येते आहे.

पाणी टंचाईच्या तोंडावरील हिंगोलीतील विरोधाभासी चित्र

हिंगोली जिल्ह्यात मागील तीन ते चार वर्षांपासून अत्यल्प पर्जन्यमानाची स्थिती आहे. यावर्षी ७५ मी.मी. एवढा पाऊस जिल्ह्यात झाला असून, आजघडीला विहिरी, हातपंप, तलाव कोरडे पडलेले आहेत. आजही जिल्ह्यातील पाचही पंचायत समित्यात ३० ते ४० पेक्षा अधिक गावांनी टँकरसाठी अधिग्रहन प्रस्ताव पाठवले आहेत. यापैकी काही गावांचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. एवढी भीषण पाणीटंचाई असताना देखील हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मात्र चक्क पाणी माती मुरवण्यासाठी वापरण्यात येत असल्याची खळबळजनक बाब जागतिक जलदिनी उघड झाली आहे.सध्या हिंगोली जिल्ह्यात पाण्याची स्थिती अत्यंत बिकट आहे. मात्र, असे असताना प्रशासकीय व्यवस्थेकडूनच पाण्याचा अपव्यय केला जातोय. पाणी वाचविण्यासाठी जनजागृती व्हावी म्हणून जल दिंडी देखील काढली जात आहे. त्यामुळे पाण्याच्या बाबतीत खरोखरच प्रशासन गंभीर आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

Intro:हिंगोली जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट काय नवे नाही, दर वर्षीच हा जिल्हा पाणीटंचाईने चर्चेत आहे. या वर्षी तर तलावात पाणी होते तेव्हा प्रशासनाने तिकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच तलाव कोरडे ठाण पडल्यात जमा आहेत. त्यातच जगतिक जलदीनी चक्क जिल्हाधिकारी कार्यालयात माती मुरवण्यासाठी पाण्याचा अपव्यय होतोय, तर दुसरीकडे मात्र पाणी वाचविण्यासाठी जलदिंडी रॅली काढली जातेय. किती मोठा आभास जिल्ह्यात दिसून येतोय.

Body:हिंगोली जिल्ह्यात मागील तीन ते चार वर्षांपासून अत्यल्प पर्जन्यमान झालेले आहे यावर्षी ७५ मी . मी एवढा पाऊस जिल्ह्यात झाला असून, आज घडीला विहिरी हातपंप तलाव कोरडे पडलेले आहेत. आजही जिल्ह्यातील पाचही पंचायत समितीमध्ये ३० ते ४०च्या वर गावाने अधिग्रहण तर काही गावांचे टँकरचे प्रस्ताव दाखल झालेत. एवढी भीषण पाणीटंचाई असताना देखील हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मात्र चक्क पाणी माती मुरवण्यासाठी वापरण्यात येत असल्याची खळबळजनक बाब जागतिक जल दिनी उघड झालीय. आज घडीला हिंगोली जिल्हा पाण्याच्या एका एका थेंबासाठी तरसतोय, तर दुसरीकडे मात्र त्याच जिल्ह्यात पाण्याचा अपव्यय केला जातोय. वरून परत पाणी वाचविण्यासाठी प्रशासनाच्या वतीने जनजागृती व्हाही म्हणून जल दिंडी देखील काढली जातेय. त्यामुळे पाण्याच्या बाबतीत खरोखरच प्रशासन किती सज्ज आहे. हेच यावरून दिसून येतेय. आजही ग्रामीण भागातून पंचायत समिती मध्ये अधिग्रहण किंवा टँकरच्या मागणीसाठी प्रस्तावांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.

Conclusion:त्यातच प्रशासनाच्या वतीने लावलेल्या वृक्षारोपनावरही पाणी फिरलेय. मात्र इकडे प्रशासनाला माती मुरवण्याच पडलंय. जिल्हा अक्षरशः पाण्याने फफणतोय त्यामुळे कोरड्या जिल्ह्यात पाणी बचतीचे देखील महत्व काय सांगावे, हा देखील प्रशासनापुढे मोठा प्रश्न पडलेला दिसतोय. मात्र जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सुरू असलेल्या बांधकामावर माती मुरवण्यासासाठी टाकण्यात येत असलेले टँकरचे पाणी खरोखरच एखाद्या टंचाई ग्रस्त गावासाठी दिले तर त्याचा त्या गावाला किती लाभ होईल. हे शब्दात देखील सांगता येणार नाही.

टँकर चे व्हिज्युअल ftp केले आहेत. ते आणि बातमी सोबत चे व्हिज्युअल एकत्र करून बातमीत वापरावे.
सोबतच जलदिंडी चे ही व्हिज्युअल ftp केले आहेत.

सर्व व्हिज्युअल वापरावेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.