ETV Bharat / state

हिंगोली : बाहेरून येणाऱ्या मतदारांसाठी माळसेलुकरांनी केली जेवणाची सोय, मतदारराजा सुखावला - voters

बाहेरून येणाऱ्या मतदारांसाठी हिंगोलीत माळसेलु ग्रामस्थांनी केली जेवणाची सोय.... मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी केलेला माळसेलु ग्रामस्थांचा कौतुकास्पद उपक्रम... निवडणूक आयोगाकडूनही केली जातीय जनजागृती

मतदारांसाठी जेवणाची सोय
author img

By

Published : Apr 18, 2019, 12:18 PM IST

Updated : Apr 18, 2019, 12:25 PM IST

हिगोली - लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. यासाठी निवडणूक आयोग जनजागृती करत असताना ग्रामीण भागातील ग्रामस्थही मतदानवाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसून येत आहेत. हिंगोली जिल्ह्यातील माळसेलु येथे बाहेरगावावरून मतदान करण्यासाठी आलेल्या मतदारांना ग्रामस्थांच्या वतीने भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे या उपक्रमाचे मतदारातून स्वागत केले जात आहे.

मतदारांसाठी जेवणाची सोय

जिल्ह्यातील बरेचसे मतदार नोकरी निमित्त बाहेरगावी अथवा शहरामध्ये स्थलांतरीत झाले आहेत. मात्र, त्यांचे मतदान त्यांच्या मुळ गावातच आहे. असे मतदार लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी वेळात वेळ काढूण गावाकडे येतात. मात्र, गावात येणारा तो मतदार आपल्या गावातून उपाशीपोटी जाऊ नये म्हणून ग्रामस्थ त्यांची काळजी घेत आहेत. तसेच सध्या तापमानात वाढ झाल्यामुळे मतदारांचा उन्हापासून बचाव करण्यासाठीही मतदान केंद्र परिसरात मंडप उभारण्यात आलेले आहेत.

माळसेलु येथील मतदान केंद्रावर सध्या मतदानासाठी मतदारांचा म्हणावा तसा प्रतिसाद दिसून येत नाही. आतापर्यंत महिला २४५ आणि ३०५ पुरुष असे एकूण ५५० मतदान झाले आहे. मालसेलू येथे एकूण १७०० मतदान आहे.

Intro:लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत त्या चित्रावर ग्रामीण भागातही मतदानाचा टक्का वाढावा म्हणून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. हिंगोली जिल्ह्यातील माळसेलु येथे बाहेरगावावरून स्वतंत्र मतदान करण्यासाठी आलेल्या मतदारांना ग्रामस्थांच्यावतीने भोजनाची व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे या उपक्रमाचे मतदारातून स्वागत केले जात आहे. बाहेर येणारा मतदान आपल्या गावातून उपाशीपोटी जाऊ नये म्हणून ग्रामस्थ त्यांची काळजी घेत आहेत.तसेच सध्या तापमानात वाढ झाल्यामुळे मतदारांचा उन्हापासून बचाव करण्यासाठीही मतदान केंद्र परिसरात मंडप उभारण्यात आलेले आहेत. माळसेलु येथील मतदान केंद्रावर सध्या तरी मतदान करण्यासाठी प्रतिसाद दिसून येत नाही. आता पर्यंत महिला 245 अन 305 पुरुष 550 मतदान झाले आहे. मालसेलू येथे एकूण 1700 मतदान आहे.

Body:हिंगोली

Conclusion:हिंगोली
Last Updated : Apr 18, 2019, 12:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.