हिंगोली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झाले आहे. संचारबंदीत आता नागरिकांसाठी भाजीपाला एक दिवसाआड मिळणार आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काढले आहेत. त्यासाठी नगर पालिका ठिकाण उपलब्ध करून देईल. मात्र, त्या भाजीपाला विक्रेत्यांकडे सॅनिटायझर असणे गरजेचे आहे. सोबतच किराणा दुकान दारांनी देखील खबरदारी घेणे गरजेचे, असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.
भाजीपाला विक्रेते भाजीमंडीत भाजीपाल्याची विक्री न करता संबंधित तालुक्याचे तहसीलदार व मुख्याधिकारी यांनी ठरवून दिलेल्या ठिकाणी नमुद दिवशी व वेळी भाजीपाला विक्री करू शकणार आहेत. तसेच संबधित मुख्याधिकारी यांचे ओळखपत्र घेण्याची गरज आहे. तसेच किराणा माल विक्रेत्यांनी देखील नमूद दिवशी व वेळेतच किराणामालाची विक्री करावी. माल खरेदी करण्यासाठी आलेल्या दोन ग्राहकामध्ये एक मिटरचे अंतर राहील याची दक्षता संबधित विक्रेत्यांनी घ्यावी. तसेच ग्राहकांसाठी सॅनिटायझरची व्यवस्था करावी अन् 10 ते दुपारी 1 या वेळेत विक्री व्हावी, असेही आदेश देण्यात आले आहेत.
या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम 188 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील. संबंधित आयोजक तसेच आस्थापना मालक/चालक/व्यवस्थापक यांना प्रत्येकास आदेशापूर्वी स्वतंत्र नोटीस बजावणी शक्य नसल्याने संबंधित आदेश एकतर्फी काढण्यात आले आहेत. याबाबतची माहिती प्रसार माध्यमे, उप विभागीय दंडाधिकारी, तालुका कार्यकारी दंडाधिकारी, पोलीस ठाणे यांचे नोटीस बोर्डवर नागरिकांच्या सुविधेसाठी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगितले.
कोरोना इफेक्ट : एक दिवसाआड मिळेल भाजीपाला; विक्री करताना घ्यावी लागणार 'ही' काळजी - कोरोना भारत
भाजीपाला विक्रेते भाजीमंडीत भाजीपाल्याची विक्री न करता संबंधित तालुक्याचे तहसीलदार व मुख्याधिकारी यांनी ठरवून दिलेल्या ठिकाणी नमुद दिवशी व वेळी भाजीपाला विक्री करू शकणार आहेत. तसेच संबधित मुख्याधिकारी यांचे ओळखपत्र घेण्याची गरज आहे. तसेच किराणा माल विक्रेत्यांनी देखील नमूद दिवशी व वेळेतच किराणामालाची विक्री करावी.
![कोरोना इफेक्ट : एक दिवसाआड मिळेल भाजीपाला; विक्री करताना घ्यावी लागणार 'ही' काळजी corona update](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6534086-122-6534086-1585105487401.jpg?imwidth=3840)