ETV Bharat / state

हिंगोलीत पुन्हा 'त्याच पुलाच्या' खड्डयात गेले दोघांचे बळी, यापूर्वी गेले चार जीव - सेनगाव जिंतूर महामार्ग

शनिवारी रात्री पवार आणि पाईकराव हे युवक हे दुचाकीने जात असताना त्यांची दुचाकी पुलावरून वीस फूट खाली खड्ड्यात कोसळली. त्याच त्यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र रात्र असल्याने हा अपघात सकाळपर्यंत कोणाच्याही लक्षात आला नाही. त्यामुळे दोघांचेही मृतदेह रात्रभर पाण्यातच राहिले होते.

त्याच पुलाच्या' खड्डयात गेले दोघांचे बळी

author img

By

Published : Sep 12, 2021, 11:16 AM IST

हिंगोली- जिल्ह्यात अपघाताचे सत्र अद्याप सुरूच आहे. विशेष म्हणजे या प्रशासनही तितकचे जबाबदार असल्याचा एक प्रकार समोर आला आहे. सेनगाव-जिंतूर रोडवर येलदरी येथे पुलाच्या बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात एक दुचाकी कोसळून आणखी एक अपघात झाला. यामध्ये दोन्ही दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. या पूर्वी देखील याच पुलाच्या खड्ड्यामध्ये एक कार सोसळून चार जणांचा बुडून मृत्यू झाला होता. तेव्हा पासून हा पूल जिल्हा भरात चर्चेचा विषय होता. मात्र कारचा अपघात घडल्यानंतरही बांंधकाम ठेकदार अथवा बांधकाम विभागाच्या प्रशासनाने या अपघातग्रस्त जागेवर सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीच उपाययोजना केली नाही. अखेर शनिवारी आणखी दोन जणांना आपला जीव गमवावा लागला.

त्याच पुलाच्या' खड्डयात गेले दोघांचे बळी

सचिन दत्तराव पवार (२७), तेजस चंद्रभान पाईकराव (२२) रा. खानापूर चित्ता अशी मृतांची नावे आहेत. हे दोघे रविवारी दुपारी घरून कुणाला ही काहीही न सांगता बाहेर गावी गेले होते. मात्र या दोघांचाही अपघातात मृत्यू झाल्याची माहिती या दोघांच्याही नातेवाईकांना मिळाली, अन त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर हे दोघे कुठे आणि कोणाकडे गेले होते याची माहिती घेण्याचा शोध सुरू केला असता, हे दोघे जण कोणाचातरी वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते, अशी माहिती त्यांच्या काही मित्रांनी सांगितली. मात्र दुर्दैवाने सेनगाव-जिंतूर रोड वरील पुलाच्या खड्ड्यात काळाने त्यांच्यावर झडप घातली. या राज्य महामार्गावर गेल्या अनेक दिवसापासून दिशादर्शक फलक बसवण्यात आला नाही. त्यामुळे वाहन चालकांची दिशाभूल वाहने खड्ड्यात कोसळून जीवघेण्या अपघाताच्या घटना घडत आहेत.

रात्रभर पुलाच्या खड्ड्यातच होते मृतदेह-

हिंगोली जिल्ह्यात चारही बाजूने रात्रंदिवस एक करीत राष्ट्रीय महामार्गाची कामे सुरू आहेत, अशा परिस्थितीमध्ये सेनगाव ते जिंतूर रोड वरील येलदरी रस्त्यावर सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामा जवळ दिशादर्शक फलक बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे येथे नेहमीच अपघाताची मालिका सुरूच आहे, अशा परिस्थितीत शनिवारी रात्री पवार आणि पाईकराव हे युवक हे दुचाकीने जात असताना त्यांची दुचाकी पुलावरून वीस फूट खाली खड्ड्यात कोसळली. त्याच त्यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र रात्र असल्याने हा अपघात सकाळपर्यंत कोणाच्याही लक्षात आला नाही. त्यामुळे दोघांचेही मृतदेह रात्रभर पाण्यातच राहिले होते.

यापूर्वी कोसळली होती कार, चौघाचा गेला होता बळी-

हा पूल मृत्यूचा सापळा बनला आहे. पाच महिन्यापूर्वी याच पुलावरून एक चार चाकी वाहन खाली कोसळले होते. या पुलाच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पाणी साचले असल्यामुळे कार पाण्यात बुडून चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. मात्र, त्यानंतरही प्रशासनाला जाग आली नाही. या ठिकाणी पुलांचे बांधकाम हे गतीने केले तर नाहीच, मात्र दिशादर्शक फलक देखील बसवण्याची तसदी घेण्यात आलेली नाही. रात्रीच्या सुमारास हा नजरेस पडत नाही. त्यामुळे येथे अपघात होतात, शिवाय ते फक्त दिवसा उजेडीच लक्षात येतात. त्यामुळे आता या प्रकऱणी प्रशासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पोलिसांनी घेतली घटनास्थळी धाव-

घटनेची माहिती कळताच सेनगाव पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक रंजित भोईटे हे पथकासह दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने दोघांचेही मृतदेह बाहेर काढले पण आधारासाठी सेनगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहेत. या प्रकरणी अजून तरी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.