ETV Bharat / state

हिंगोलीकरांची चिंता वाढली; जिल्ह्यात पुन्हा दोन कोरोना संशयित रुग्ण - 2 corona suspected patient hingoli

शहरात भाजीपाला खरेदी करण्यासाठी गर्दी होऊ नये, म्हणून जागोजागी भाजीपाला बाजार सुरू करून या बाजारांमध्ये सोशल डिस्टन्सिंगसाठी १ मीटर अंतरावर मार्किंग करण्यात आली आहे. एवढी खबरदारी घेतली जात असतानाही पुन्हा जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण वॉर्डमध्ये २ कोरोना संशयित रुग्ण दाखल झाले आहे. त्यामुळे, आरोग्य विभागाची धावपळ वाढली असून पोलीस प्रशासनही जीव ओतून कामाला लागले आहे.

corona suspected patient hingoli
प्रतिकात्मक
author img

By

Published : Mar 31, 2020, 9:22 PM IST

Updated : Mar 31, 2020, 9:50 PM IST

हिंगोली- जिल्हा सामान्य रुग्णालयात उभारण्यात आलेल्या विलगीकरण वॉर्डमध्ये २ कोरोना संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. एका रुग्णास काल दाखल करण्यात आले असून आज दुसऱ्या रुग्णास दाखल करण्यात आले आहे. हे दोन्ही रुग्ण पुरुष असून, ते कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संपर्कात होते. त्यांच्यावर उपचार सुरू असून एका पाठोपाठ कोरोना संशयित रुग्ण वाढल्याने हिंगोलीकरांची आता चांगलीच चिंता वाढली आहे. प्रशासन हात जोडून नागरिकांना रस्त्यावर न निघण्याचे आवाहन करत आहे.

संपूर्ण जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे नागरिकांची झोपच उडाली आहे. जिल्हा प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे. संचारबंदी लागू असताना रस्त्यावर कोणाला न फिरू देण्यासंदर्भात पोलीस प्रशासन खबरदारी घेत आहे. तर हिंगोली, वसमत नगरपालिका आणि कळमनुरी, सेनगाव, ओंढा-नागनाथ नगर पंचायतीच्यावतीने शहरात स्वच्छता ठेवण्यासंदर्भात प्रयत्न केले जात आहे.

शहरात भाजीपाला खरेदी करण्यासाठी गर्दी होऊ नये, म्हणून जागोजागी भाजीपाला बाजार सुरू करून या बाजारांमध्ये सोशल डिस्टन्सिंगसाठी १ मीटर अंतरावर मार्किंग करण्यात आली आहे. एवढी खबरदारी घेतली जात असतानाही पुन्हा जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण वॉर्डमध्ये २ कोरोना संशयित रुग्ण दाखल झाले आहे. त्यामुळे, आरोग्य विभागाची धावपळ वाढली असून पोलीस प्रशासनही जीव ओतून कामाला लागले आहे. विशेष म्हणजे, दाखल झालेले रुग्ण हे त्यांच्या आधी कोरोना झालेल्यांच्या संपर्कातील आहेत. या दोघांमध्ये सध्या कोरोनाची लक्षणे दिसून आली नसून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

हेही वाचा- कोरोनाचा फटका; शेतकऱ्यांकडून 3 रुपये किलोने टरबूज खरेदी करताहेत व्यापारी!

Last Updated : Mar 31, 2020, 9:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.