ETV Bharat / state

सोनाराला फसवून सोने लुटणाऱ्या टोळीतल्या दोघांना हिंगोलीत अटक

author img

By

Published : Feb 9, 2021, 6:48 PM IST

वसमत शहरातील सराफा बाजारातील दुकानातून सोन्याचे शिक्के, सोन्याचे तुकडे अन सोन्याचे वेड, दागिने चोरी गेल्याप्रकरणी वसमत शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.

सोने लुटणाऱ्या टोळीतल्या दोघांना हिंगोलीत अटक

हिंगोली - वसमत शहरातील सराफा बाजारातील दुकानातून सोन्याचे शिक्के, सोन्याचे तुकडे अन सोन्याचे वेड, दागिने चोरी गेल्याप्रकरणी वसमत शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. घटनेतील आरोपी हे बिदर राज्यातील असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तेथून दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून एक लाख सात हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

एक लाख सात हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त-

शब्बीर आली अफसर अली (३१), मोहम्मद अली अफसर अली (२७) ईराणी गल्ली बिद्रा रोड बिदर राज्य, अशी संशयीत आरोपींची नावे आहेत. पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या नेतृत्वाखाली तयार केलेल्या पथकाने बिदर राज्यात धाव घेतली. तेथून दोघांना विश्वसात घेऊन विचारणा केली. त्यानंतर रजा हुसेन उर्फ तसिया अफसर अली, गुलाम अली यांनी ११ जानेवारी २०२१ रोजी वसमत येथील सराफामध्ये चोरी केल्याची कबुली दिली. पथकाने त्याच्यांकडून गुन्ह्यात वापरलेली एक दुचाकी, सोन्याचे दागिने, असा एकूण एक लाख सात हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मोठी टोळी असण्याची आहे शक्यता-

या घटनेतील आरोपी हे सराईत गुन्हेगार असून यांचा अनेक टोळ्यांशी संबंध असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. आरोपींचा कसून शोध घेतला जात असून त्यांच्याकडून अजूनही चोरीच्या घटना उघडकीस होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ही टोळी सोनाराला फसवून चोरी करण्यात तरबेज आहे.

हेही वाचा- पाकिस्तानातून परतलेल्या हसीना यांचे औरंगाबादेत निधन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.