हिंगोली - पुलावामा येथे झालेल्या दहशतवादी हल्यात वीरमरण आलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांना शहरात आदरांजली अर्पण करण्यात आली. नागरिकांनी पाकिस्तानचा प्रतिकात्मक पुतळा जाळून संताप व्यक्त केला. यावेळी शहरातील बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. शहरात ठिकठिकाणी श्रध्दांजलीचे फलक नागरिकांनी लावले आहेत.
गुरुवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास राखीव दलाच्या जवानांच्या गाडीवर दहशवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात ४० हून अधिक जवानांना वीरमरण पत्कारावे लागले. या घटनेमुळे देशभरातून संपात व्यक्त केला जात आहे. याच घटनेचा निषेध आज हिगोंली शहरात करण्यात आला. जिल्हा व्यापारी संघटनांनी बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे शहरामध्ये शुकशुकाट पसरला होता. शुक्रवारी संध्याकाळी शहरात कँडल मार्चही काढण्यात आला होता.