ETV Bharat / state

साहेब शाळेत खूप थंडी अन् पाऊस पण लागतोय ओ..!

सेनगाव तालुक्यातील घोरदरी हा आदिवासी बहुल भाग आहे. खासगी शाळांचे शुल्क भरण्याची कल्पनाही हे लोक करू शकत नाहीत. अशावेळी या पालकांना आधार राहतो तो सरकारी शाळांचा. मात्र, मुंगसाजीनगरच्या शाळेची अवस्था पाहता मुलांच्या शिक्षणाची दैना होत आहे.

शाळा
शाळा
author img

By

Published : Jan 4, 2020, 8:18 AM IST

Updated : Jan 4, 2020, 1:11 PM IST

हिंगोली - राज्याचा शिक्षण विभाग प्राथमिक शाळा डिजिटल झाल्याचा गाजावाजा करत आहे. घोरदरी येथील एका माळरानावर भरत असलेल्या मुंगसाजीनगर शाळेकडे पाहिले की, हा दावा फोल असल्याचा प्रत्यय येतो.

साहेब शाळेत खूप थंडी अन् पाऊस पण लागतोय

सेनगाव तालुक्यातील घोरदरी हा आदिवासी बहुल भाग आहे. दररोजच्या जगण्यासाठी या लोकांना कष्ट करण्याशिवाय पर्याय नाही. खासगी शाळांचे शुल्क भरण्याची कल्पनाही हे लोक नाही करू शकत. अशावेळी या पालकांना आधार राहतो तो सरकारी शाळांचा. मात्र, मुंगसाजीनगरच्या शाळेची अवस्था पाहता मुलांच्या शिक्षणाची दैना होत आहे.

या शाळेला भिंती नाहीत, नीट छप्परही नाही. माळरानावरील एका झोपडीमध्ये ही शाळा भरते. त्यामुळे शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या चिमुकल्यांना ऊन, पाऊस आणि थंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. पट संख्या कमी असताना, शालेय समिती अध्यक्षाच्या एका खोलीत ही शाळा भरत होती. मात्र, आता पट संख्या वाढत गेल्याने, खोली अपुरी पडू लागली. शोधाशोध केल्यानंतरही शाळेला कुठेच जागा मिळाली नाही. शेवटी विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी माळरानावर झोपडी उभारुन शाळा सुरू करावी लागली.

शाळेला इमारत मिळण्यासाठी पालकांनी आणि शिक्षकांनी वारंवार पाठपुरावा केला. आपली रोजंदारी बुडवून सरकारी कार्यालयांच्या पायऱ्या झिजवल्या. तरीही, सरकारच्या शिक्षण विभागाला जाग आली नाही. आता हे चिमुकले हात जोडून शासनाला शाळेसाठी इमारत देण्याची विनंती करत आहेत. खरोखरच आता या चिमुकल्यांची हाक शासनापर्यंत पोहोचेल का? हा प्रश्न आहे.

Intro:*

हिंगोली- शिक्षण विभाग डिजिटल शाळा झाल्याचा गाजावाजा करत आहे. मात्र हा गाजावाजा हाणून पाडलय तो सेनगाव तालुक्यातील घोरदरी येथील एका माळरानावर भरत असलेल्या मुंगसाजीनगर येथील शाळेने. शाळेला भिंती नाहीत, नाही टिनपत्र शाळा भरतेय ती फक्त एका झोपडीत. त्यामुळे शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या चिमुकल्यांना पाऊस थंडीचा त्रास होतोय. त्यामुळे चिमुकले शासनाला हात जोडून शाळेसाठी ईमारत देण्याची विनंती अनेक वर्षांपासून करत करताहेत. यावरून मात्र हिंगोलीच्या शिक्षण विभागाचे पितळ उघडे पडले हे ही तेव्हडेच खरे.

Body:सेनगाव तालुक्यातील घोरदरी येथील आदिवासी बहुल असलेल्या मुंगसाजी नगर येथील वस्ती शाळेची मोठी दैना सूरु आहे. खाजगी शाळांनी तर आई तर एवढा पालकांना एवढा वेढा घातलाय, त्या शाळेच्या फिस ऐकून ही थरकाप सुटल्या शिवाय राहत नाही. मात्र ज्याना संध्याकाळच्या भाकरीसाठी भ्रांत करावी लागतेय. हीच अवस्था मुंगसाजीनगर येथील पालकांच्या बाबतीत आहे. पट संख्या कमी होती तेव्हा ही शालेय समिती अध्यक्षाच्या एका खोलीत भरायची मात्र आता पट संख्या वाढत गेल्याने, खोली अपुरी पडू लागली. अन मग शोधाशोध सुरू झाला जागेसाठी. मात्र कुठे जागाच मिळाली नाही, अन शेवटी विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी माळरानात झोपडी उभारुन सुरू करावी लागली शाळा. शाळेला ईमारत मिळण्यासाठी पालकांनी खूप पाठपुरावा केला. वारंवार रोजनदारी बुडवून शहरी ठिकाणी धाव घ्यावि लागत होती. तरी ही काही उपयोग झाला नाही. शेवटी एका कुडाच्या झोपडीत शाळा भरवावी लागतेय. सध्या पट संख्या 17 आहे. वातारण बदलाचा या चिमुकल्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे चिमुकले शासनाला आता हात जोडून शाळेच्या इमारतीसाठी विनवणी करीत आहेत. खरोखरच आता या चिमुकल्यांची हाक शासनापर्यंत पोहोचेल का पोहोचली स्तर त्यांना इमारत मिळेल का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. Conclusion:एकीकडे झोपडीमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तर दुसरीकडे मात्र काही शाळा आर्थिक लाभापोटी शाळेच्या छतावर मोबाईल मनोरा उभारून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत आहेत. या सर्व प्रकाराने हिंगोलीचा शिक्षण विभाग मात्र आता चांगलाच चर्चेत आला आहे. आजू तरी त्या शाळेसाठी कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत.
Last Updated : Jan 4, 2020, 1:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.