हिंगोली - जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील 13 अधिकाऱ्यांच्या जिल्हास्तरीय बदल्या आज (शनिवारी) करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. बदल्यामुळे काही अधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे तर काही अधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
हेही वाचा - प्रदीप शर्मा शिवसेनेत, पोलीस खात्यात चकमक दाखवल्यानंतर राजकारणात चमकणार?
बासंबा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंढे यांची ओंढा नागनाथ, पोलीस उपनिरीक्षक संदीप थंडवे यांची गोरेगावरुन हट्टा तर हट्टा येथील ज्ञानेश्वर शिंदे यांची गोरेगाव, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानोबा मूलगीर यांची कळमनुरी पोलीस ठाण्यात तर कळमनुरीचे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश खंदारे हिंगोली शहर तर येथीलच गजानन मोरे यांची हिंगोली नियंत्रण कक्षात, ओंढा नागनाथ येथून दिक्षा लेकुळे यांची हिंगोली नियंत्रण तर नियंत्रण कक्षातील रवी हुंडेकर आखाडा बाळापूर आणि सुनील गोपीनवार नरसी तर येथील नामदेव बोधनपाड वसमत शहर तर येथील विलास चवळी वाचक शाखा हिंगोली येथे बदली करण्यात आली आहे.
हेही वाचा - धुळे: राजस्थानकडे जाणारा ८० लाख रुपयांचा गुटखा शिरपूर पोलिसांनी केला जप्त
राजेश मलपिल्लू यांची बासंबा पोलीस ठाणे तर श्रीदेवी पाटील यांची वसमत येथे अशा एकूण 13 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. तर ओंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे कुंदनकुमार वाघमारे आणि बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणपत राहिरे यांची परभणी येथे बदली झाली आहे. बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी तात्काळ हजर करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी काढले आहेत.