ETV Bharat / state

प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम उधळून लावू; लंडनहून धमकीचा फोन आल्याचा खासदार हेमंत पाटील यांचा दावा - Threat Call to MP Hemant Patil

Threat Call to MP Hemant Patil : लोकसभेचे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांना लंडनहून धमकीचा फोन आल्याचा दावा खासदार हेमंत पाटील यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी स्वतः राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्रालयासह राज्य सरकारला पत्र लिहिलंय.

खासदार हेमंत पाटील
खासदार हेमंत पाटील
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 23, 2023, 11:19 AM IST

Updated : Dec 23, 2023, 11:39 AM IST

हिंगोली Threat Call to MP Hemant Patil : हिंगोलीचे लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांना लंडन इथून धमकीचा फोन आलाय. यामध्ये 26 जानेवारीला दिल्ली इथं होणारा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम उधळून लावण्याची धमकी दिल्याचा दावा त्यांनी केला आहे. यानंतर खासदार पाटील यांनी केंद्र आणि राज्य सरकारला पत्राद्वारे ही माहिती दिलीय. या धमकीनंतर शुक्रवारपासून खासदार हेमंत पाटील यांच्या घरासमोरील बंदोबस्त वाढवण्यात आल्याचं सुत्रांनी सांगितलंय.

पत्र
पत्र

दिल्लीला जाऊन दिलं पत्र : या सर्व प्रकारानंतर खासदार पाटील यांनी तातडीनं राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्रालयासह राज्य सरकारला पत्र पाठवलंय. याशिवाय त्यांनी दिल्ली इथं जाऊन पत्र दिल्याचंही सुत्रांनी सांगितलंय. यामुळं खासदार पाटील यांच्या घरासमोरील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून एसआयडी सोबतच एसपीयूचे जवान बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

खासदारांनी पत्रात काय लिहिलं : हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांना 14 डिसेंबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास लंडन इथून एक निनावी फोन आला. यात विदेशातून पन्नू नामक एका व्यक्तीनं संवाद साधल्याचं खासदार हेमंत पाटील यांनी पत्रात नमूद केलं. तसंच या फोनमध्ये 26 जानेवारी रोजी दिल्ली येथील प्रजासत्ताक सोहळा उधळण्याचीही धमकी दिल्याचंही खासदार पाटील यांनी पत्रात म्हटलंय. त्यानंतर त्यानं पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा फोन घेतला नाही, असंही त्यांनी म्हटलंय. या संदर्भात खासदार पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

लोकप्रतिनीधींना काही दिवसांपासून धमक्यांचं सत्र सुरुच : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक लोकप्रतिनीधींना मोठ्या प्रमाणावर धमक्यांचं सत्र सुरुच आहे. काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनाही धमक्यांचे फोन आले आहेत. तसंच उद्योगपती मुकेश अंबानी, अभिनेता सलमान खानलाही जीवे मारण्याची धमकी मिळालीय.

हेही वाचा :

  1. Vijay Wadettiwar Death Threat: विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना जीवे मारण्याची धमकी, गृहमंत्र्यांना पत्र लिहून 'ही' केली मागणी
  2. देवेंद्र फडणवीस, मंत्री मुनगंटीवार यांना जीवे मारण्याची धमकी; विदर्भवादी नेत्यावर गुन्हा दाखल
  3. Death Threat to Mukesh Ambani : 400 कोटी द्या नाहीतर...; उद्योगपती मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची तिसऱ्यांदा धमकी

Last Updated : Dec 23, 2023, 11:39 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.