हिंगोली - तृतीयपंथीय बनून पैसे मागणाऱ्या एका तरुणाला तृतीयपंथीयांनी बेदम चोप दिल्याची घटना घडली आहे. तृतीयपंथींनी त्या तरुणाला भर चौकात चोप देत त्याचे कपडे फाडले. कशीबशी त्या युवकाने यातून सुटका करुन धूम ठोकली. याचा एक व्हिडीओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हिंगोली शहरात मागील काही महिन्यांपासून तृतीयपंथीचं रुप धारण करुन दोन ते तीन युवक रस्त्यावरुन येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना पैसे मागत होते. त्यांचा वेश पाहून लोकंही त्यांना पैसे देत होते. ही बाब खऱ्या तृतीयपंथींना कळाली आणि त्यांनी पाळत ठेवली. तेव्हा एक युवक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पैसे मागताना दिसला.
तृतीयपंथींनी त्याला पकडून बेदम चोप दिला. यादरम्यान त्यांनी त्या तरुणाचे कपडेही फाडले. शेवटी त्या तरुणाने यातून कशीबशी सुटका करुन घेतली आणि तिथून धूम ठोकली. या मारहाणीचा व्हिडीओ रस्त्यावरील युवकांनी टिपला. सद्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेही वाचा - हिंगोली : बनावट नोटांच्या कारखान्याचा पर्दाफाश; 17 लाखांच्या नोटा जप्त
हेही वाचा - "मुलीला शेवटचे पहायचे होते", परभणीतील कोविड वॉर्डमधून पळ काढणाऱ्या गुन्हेगाराची कबुली