ETV Bharat / state

हिंगोलीत चोरट्यांची मजल वाढली; पोलीस ठाण्यातील जप्त दारू पळवली

author img

By

Published : Oct 19, 2019, 9:16 AM IST

हिंगोली पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करून मोठ्या प्रमाणात जप्त केलेला देशी विदेशीचा दारूसाठा मुद्देमाल कक्षात ठेवला होता. मात्र, चोरट्यांनी चक्क मुद्देमाल कक्षाच्या खोलीच्या खिडक्यांचे गज कापून 60 हजार रुपये किमतीचे 26 देशी दारूचे बॉक्स तर 14 हजार रुपये किमतीच्या 180 एमएलच्या 64 बाटल्या चोरून नेल्या आहेत.

हिंगोलीत चोरट्यांची मजल वाढली

हिंगोली - मागील अनेक दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. हा धुमाकूळ कमी करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. मात्र, अशा परिस्थितीत चक्क चोरट्यांनी पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमाल कक्षातील दारूवरच डल्ला मारला आहे. त्यामुळे पोलिसांची चोरट्यांच्या मनात किती भीती आहे का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

पोलीस प्रशासनाची नाचक्की होऊ नये, म्हणून पोलीस प्रशासन कमालीची गोपनीयता देखील पाळत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केल्याने हे बिंग फुटले आहे.

हेही वाचा - सायकल रॅलीद्वारे हिंगोलीत मतदान जनजागृती

हिंगोली पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करून मोठ्या प्रमाणात जप्त केलेला देशी विदेशीचा दारूसाठा मुद्देमाल कक्षात ठेवला होता. मात्र, चोरट्यांनी चक्क मुद्देमाल कक्षाच्या खोलीच्या खिडक्यांचे गज कापून 60 हजार रुपये किमतीचे 26 देशी दारूचे बॉक्स तर 14 हजार रुपये किमतीच्या 180 एमएलच्या 64 बाटल्या चोरून नेल्या आहेत. या प्रकाराने पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. तर ऐन निवडणुकीच्या काळात हिंगोलीचे पोलीस प्रशासन किती सज्ज आहे? हे या गोष्टीवरून समोर आले आहे.

हेही वाचा - हिंगोलीत पावसाची जोरदार हजेरी; शेतकऱ्यांची उडाली धांदल

एवढेच नव्हे तर या घटनेची कोणाला माहिती होवू नये, म्हणून शहर उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक रामेश्वर वैंजने यांनी या घटनेतील काहीच माहिती नसल्याचे सांगत आहेत. विशेष म्हणजे अशी कोणती घटनाच घडली नसल्याचे पोलीस प्रशासन दर्शवत आहे. मात्र, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अशोक घोरबंड यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. या प्रकरणी पोलीस जमादार सखाराम मोहनराव थेटे यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Intro:

हिंगोली- मागील अनेक दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात चोऱ्यांंट्याने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. हा धुमाकूळ कमी करण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत मात्र अशासच परिस्थितीत चक्क चोरट्याने पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमाल कक्षातील दारूवरच डल्ला मारलाय. त्यामुळे पोलिसांची चोरट्यांच्या मनात किती भीती आहे. हेच या धक्कादायक घटनेवरून समोर आलेय. पोलीस प्रशासनाची नाचकी होऊनये म्हणून पोलीस प्रशासन कमालीची गोपनीयता देखील पाळत असल्याचे समोर आलंय. या प्रकरणी गुन्हा दाखल केल्याने कुठे हे बिंग फुटले आहे.

Body:हिंगोली पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करून मोठ्या प्रमाणात जप्त केलेला देशी विदेशीचा दारूसाठा मुद्देमाल कक्षात ठेवला होता. मात्र चोरट्यांने चक्क आपला मोर्चा वळवीत मुद्देमाल कक्षाच्या खोलीला असलेल्या खिडक्यांचे गज कापून साठ हजार रुपये किंमतीचे 26 देशी दारूचे बॉक्स तर 14 हजार रुपये किंमतीच्या 180एमएलच्या 64 बाटल्या चोरून नेल्यात. या प्रकाराने पोलीस प्रशासनात खळबळ उडाली जरी असली तरी ऐन निवडणुकीच्या काळात हिंगोलीचे पोलीस प्रशासन किती सज्ज आहे हेच या घटनेवरून समोर आलंय. असे ही हे पोलीस प्राशासन नेहमीच वेगवेगळ्या कार्याने चर्चेत राहतेय. या घटनेने पुन्हा उजाळा मिळालाय. एवढेच नव्हे तर याची कुणाल माहिती लागू नये म्हणून शहर उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक रामेश्वर वैंजने देखील मला या घटनेत काहीच माहिती नसल्याचे सांगत आहेत. विशेष म्हणजे अशी कोणती घटनाच घडली नसल्याचे पोलीस प्रशासन दर्शवत आहे. असेल काही तर आपणास निश्चित कळवतो असा दिलासा दिला जात होता. मात्र शहर पोलीस ठाण्याचे पोनि अशोक घोरबंड यांनी या घटनेला दुजोरा दिला.Conclusion:चोरीला गेलेली दारू जप्त केल्याचे ही त्यांनी सांगितले. या प्रकरणी पोलीस जमादार सखाराम मोहनराव थेटे यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.