ETV Bharat / state

विहरित आढळला पशुवैद्यकीय डॉक्टरांचा मृतदेह - hingoli police news

त्यांच्या डोक्याला मार लागलेला असल्याने हा घातपात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र त्यांचा मृतदेह आढळून आल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

hingoli
hingoli
author img

By

Published : Dec 11, 2020, 3:19 PM IST

हिंगोली - सेनगाव तालुक्यातील येथे एका विहिरीमध्ये वैद्यकीय डॉक्टरचा मृतदेह आढळला आहे. त्यांच्या डोक्याला मार लागलेला असल्याने हा घातपात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र त्यांचा मृतदेह आढळून आल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

खुनाच्या घटनांमध्ये वाढ

जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून खुनाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे धक्कादायक चित्र आढळून येत आहे. श्याम गजाननराव नायक (२३, रा. सवना, ता. सेनगाव) असे मृत डॉक्टरचे नाव आहे. नायक हे गुरुवारी रात्री घरातून गायब झाले होते. त्यांचा नातेवाईकांनी बराच शोध घेतला, मित्र मंडळीकडेदेखील विचारणा केली, मात्र ते कुठे ही आढळून आले नाहीत. अखेर गावापासून काही अंतरावर असलेल्या विहिरीत डॉ. नायक यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती कळताच गोरेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून मृतदेह नागरिकांच्या मदतीने पाण्याबाहेर काढला.

अद्याप गुन्हा दाखल नाही

पशुवैद्यकीय डॉक्टर नायक यांचा मृतदेह विहिरीमध्ये आढळल्यामुळे या भागात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अजून तरी कोणताही गुन्हा दाखल झालेला नसला तरीही पोलीस प्रशासनाच्यावतीने बारकाईने तपास केला जातोय.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.