ETV Bharat / state

हिंगोलीत शॉट सर्किटमुळे जळाली 9 लाखांची हळद; व्यापारी हवालदिल - hingoli news

दौलत मुरबाड आणि आशिष राजमले राका यांचा हळदीचा कारखाना आहे. या कारखान्यात शुक्रवारी शॉट सर्किटमुळे आग लागली आणि जवळपास 9 लाख रुपयांची हळद व इतर साहित्यांची राख झाली आहे.

हिंगोलीत शॉट सर्किटमुळे जळाली 9 लाखांची हळद; व्यापारी हवालदिल

author img

By

Published : May 2, 2020, 11:51 AM IST

हिंगोली - आधीच कोरोनाने सर्वच सैरावैरा झालेले आहेत. अजून लॉकडाऊन वाढल्याने धाकधूक वाढली आहे. अशात वसमत तालुक्यातील माळवटा फाटा येथे असलेल्या कारखान्यातील शॉट सर्किटने हळदीसह इतर साहित्य जळून अंदाजे 9 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या नवीन संकटाने व्यापारी चांगलेच हादरून गेले आहेत.

दौलत मुरबाड आणि आशिष राजमले राका यांचा हळदीचा कारखाना आहे. या कारखान्यात शुक्रवारी शॉट सर्किटमुळे आग लागली आणि जवळपास 9 लाख रुपयांची हळद व इतर साहित्यांची राख झाली आहे. अगोदरच कोरोनाच्या संकटात सापडलेल्या व्यापाऱ्यांवर आज हे संकट येऊन ठेपले आहे. शॉट सर्किटने अचानक लागलेल्या आगीत कारखान्यातील सर्वच हळद जळून गेली असून, हळद टाकण्यासाठी आणलेला बारदाना अन् टिन शेडसह इतर साहित्य जळून खाक झाले आहे.

दरम्यान, उन्हाचा पारा वाढलेला असल्याने आग आटोक्यात आणणे चांगलेच कठीण झाले होते. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आग आटोक्यात आली अन् पुढील दुर्घटना टळली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.