ETV Bharat / state

अहो मीच आहे खरा सुभाष वानखेडे....काँग्रेसच्या उमेदवारावर आली वेळ - Subhash Wankhede

मतदार संभ्रमात पडू नयेत म्हणून, काँग्रेसच्या वानखेडेंना प्रचारात मीच खरा सुभाष वानखेडे आहे, असे डोकं पिटकून पिटकून सांगण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत केलेल्या विकासाचे कामे सांगण्याऐवजी मीच खरा उमेदवार असल्याचे त्यांना सांगावे लागत आहे.

सुभाष वानखेडे
author img

By

Published : Apr 6, 2019, 5:28 PM IST

Updated : Apr 6, 2019, 10:29 PM IST

हिंगोली - जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची सध्या जोरात रणधुमाळी सुरू आहे. विविध पक्षाचे उमेदवार उन्हातान्हाची जराही पर्वा न करता प्रचारात मग्न आहेत. मात्र, काँग्रेसच्या उमेदवारासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. कारण या निवडणूकीत सुभाष वानखेडे नावाचे पाच उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

सुभाष वानखेडे

मतदार संभ्रमात पडू नयेत म्हणून, काँग्रेसच्या वानखेडेंना प्रचारात मीच खरा सुभाष वानखेडे आहे, असे डोकं पिटकून पिटकून सांगण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत केलेल्या विकासाचे कामे सांगण्याऐवजी मीच खरा उमेदवार असल्याचे त्यांना सांगावे लागत आहे.

हिंगोली लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात एकूण २८ उमेदवार आहेत. यात महायुतीकडून हेमंत पाटील तर वंचित बहुजन आघाडीकडून मोहन राठोड अन् काँग्रेस कडून सुभाष वानखेडे यांच्यासह अजून २५ उमेदवार रिंगणात आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसचे उमेदवार सुभाष वानखेडे यांच्याच विरोधात त्यांच्याच नावाचे हम भारतीय पार्टीकडून सुभाष नागोराव वानखेडे, बहुजन महापार्टीकडून सुभाष परसराम वानखेडे, अपक्ष सुभाष काशीबा वानखेडे, सुभाष मारोती वानखेडे, सुभाष विठ्ठल वानखेडे हे उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने काँग्रेसच्या सुभाष वानखेडेंना मीच खरा सुभाष वानखेडे असल्याचे सांगावे लागत आहे. एकाच नावाचे ५ उमेदवार रिंगणात असल्याने, आतापर्यंत केलेल्या कामाचा पाढा वाचण्यापेक्षा सर्व प्रथम नावाचेच विश्लेषण प्रचारात करावे लागत आहे. एवढेच नव्हे तर मीच खरा सुभाष वानखेडे असल्याची नामुष्की ओढवल्यानेही हिंगोली लोकसभा मतदार संघात एकच चर्चा रंगत आहे.

काँगेसच्या सुभाष वानखेडे यांच्या प्रचार सभा तीन ते चार दिवसांपासून सुरू झाला असल्या तरी आज कुठे त्यांचा प्रचार रथ तयार झाला आहे. त्यामुळे या प्रचार रथाच्या माध्यमातून ही सुभाष वानखेडे यांचा प्रचार होणार आहे. मात्र प्रत्येक प्रचार सभेत काँग्रेसचे सुभाष वानखेडे इतर विकासाच्या मुद्यावर बोलण्यापेक्षा स्वतःच्या नावावरच सर्वाधिक जास्त बोलत आहेत. त्यामुळे स्पर्धेत असलेल्या नावाच्या उमेदवाराची भीती काँग्रेसचे उमेदवार सुभाष वानखेडे यांना असल्याचा प्रत्येय बऱ्याच प्रचार सभेतून येत आहे. खरोखरच एकाच नावामुळे किती गोंधळ होतो, हे फक्त हिंगोली लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या काँग्रेसच्या सुभाष वानखेडेंनाच अनुभव आला आहे.

Intro:हिंगोली लोकसभा निवडणुकीची सध्या जोरात रणधुमाळी सुरू आहे. विविध पक्षाचे उमेदवार उन्हातान्हाची जराही पर्वा नकरता प्रचारात मग्न आहेत. मात्र काँग्रेसच्या उमेदवारासमोर मोठा पेच निर्माण झालाय तो सुभाष वानखेडे नावानेच पाच उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने मतदार संभ्रमात पडू नयेत म्हणून, निवडणूक रिंगणात असलेल्या काँग्रेसच्या वानखेडेना प्रचारात मीच खरा सुभाष वानखेडे आहे. असे डोकं पिटकून पिटकून सांगण्याची वेळ आलीय. आतापर्यंत केलेल्या विकासाचे कामे सांगण्याऐवजी मीच खरा उमेदवार असल्याचे पुन्हा पुन्हा सांगावे लागत आहे. यावरून जिंदा असलेल्या टायगर ला एकदा नव्हे तर अनेकदा स्वतःचीच ओळख देण्याची नामुष्की ओढवली आहे.

Body:हिंगोली लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात एकूण २८ उमेदवार आहेत. यात महायुतीकडून हेमंत पाटील तर वंचित बहुजन आघाडीकडून मोहन राठोड अन काँग्रेस कडून सुभाष वानखेडे यांच्यासह अजून २५ उमेदवार रिंगणात आहेत. विषेध म्हणजे काँग्रेसचे उमेदवार सुभाष वानखेडे यांच्याच विरोधात त्यांच्याच नावाचे हम भारतीय पार्टीकडून सुभाष नागोराव वानखेडे, बहुजन महापार्टीकडून सुभाष परसराम वानखेडे, अपक्ष सुभाष काशीबा वानखेडे, सुभाष मारोती वानखेडे, सुभाष विठ्ठल वानखेडे हे उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने कॉंग्रेस च्या सुभाष वानखेडेना सर्व प्रथम मीच खरा सुभाष वानखेडे असल्याचे सांगावे लागत आहे. नावानेच उमेदवार रिंगणात असल्याने, आता पर्यंत केलेल्या कामाचा पाढा वाचण्यापेक्षा सर्व प्रथम नावाचेच विश्लेषण प्रचारात करावे लागत आहे. एवढेच नव्हे तर मीच मीच खरा सुभाष वानखेडे असल्याची नामुष्की ओढवल्यानेही हिंगोली लोकसभा मतदार संघात एकच चर्चा रंगत आहे.

Conclusion:काँगेसच्या सुभाष वानखेडे यांच्या प्रचार सभा तीन ते चार दिवसांपासून सुरू झाल्या असल्या तरी आज कुठे प्रचार रथ तयार झाले आहेत. त्यामुळे या प्रचार रथाच्या माध्यमातून ही सुभाष वानखेडे यांचा प्रचार होणार आहे. मात्र प्रत्येक प्रचार सभेत काँग्रेस चे सुभाष वानखेडे इतर विकासाच्या मुद्यावर बोलण्यापेक्षा स्वतःच्या नावावरच सर्वाधिक जस्त बोलत आहेत. त्यामुळे स्पर्धेत असलेल्या नावाच्या उमेदवाराची भीती काँग्रेसचे उमेदवार सुभाष वानखेडे यांना असल्याचा प्रत्येय बऱ्याच प्रचार सभेतून येतोय. यावरून विकासाचे तर सोडाच काँग्रेस चे सुभाष वानखेडे यांना डोकं पिकवून पिकवून आपलेच स्वतःचे नाव सांगावे लागत आहे. प्रचार सभेची सुरुवात ही आपल्याच नावाने अन शेवट ही आपल्याच नावाने करण्याची वेळ सुभाष वानखेडे यांच्यावर येऊन ठेपली आहे. खरोखरच एकाच नावामुळे किती गोंधळ होतो, हे फक्त हिंगोली लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या कॉंग्रेस च्या सुभाष वानखेडेनाच अनुभव आलाय. तर दुसरीकडे मात्र महायुतीचे हेमंत पाटील यांचे प्रचार रथ गावागावात पोहोचलेले असताना वानखेडे यांचे प्रचार रथ आज तयार झाले आहेत. त्यामुळे अजूनही हेच सुभाष वानखेडे असल्याचे सांगावे लागणार आहे.

व्हिज्युअल ftp केले आहे. बातमी सोबत जोडलेले व्हिज्युअल आणि ftp वरील व्हिज्युअल दोन्ही बातमीत वापरावेत.
Last Updated : Apr 6, 2019, 10:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.