ETV Bharat / state

हिंगोलीची संत्रे बंगळुरुच्या बाजारात; दरवर्षी संत्रे विक्रीतून अडीच लाखांचे उत्पन्न - farmer

भाजीपाला वर्गीय पिकासह संत्रा आणि पारंपरिक पीकातून वर्षाकाठी १० ते १२ लाखांचे उत्पन्न हमखास मिळत असल्याचे काळे म्हणतात.

रामा काळे
author img

By

Published : Feb 23, 2019, 9:49 PM IST

हिंगोली - मागील ३ ते ४ वर्षांपासून होत असलेल्या अत्यल्प पर्जन्यमानाचा फटका जिल्ह्यातील फळ बागायतदारांना झाला आहे. मात्र, अशा परिस्थितीत पाण्याचे अतिशय बारकाईने नियोजन करून हिंगोली परिसरात भांडेगावातील शेतकऱ्यांनी दरवर्षी ३ ते ४ लाखांचे उत्पन्न मिळवले आहे. आता भांडेगावातील संत्र्याला बंगळुरुच्या बाजारपेठेत मागणी वाढली आहे.

रामा काळे

मोठ्या प्रमाणात तळे असल्याने हिंगोली परिसरात भांडेगावाची ओळख सदनशील गाव म्हणून आहे. याच गावातील रामा काळे यांनी २ एकरात ७ वर्षांपूर्वी संत्र्याची १०० झाडे लावली. दुसऱ्याच वर्षीपासून संत्र्याचा बार लागला अन् उत्पन्नास सुरुवात झाली. त्यांना वर्षाला दोन ते अडीच लाख रुपयाचे उत्पादन मिळू लागले होते. मात्र, मागील ३ ते ४ वर्षांपासून जिल्ह्यात अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने अल्पशा पाण्यावर संत्रा बाग जगविणे चांगलेच जिकरीचे होऊन बसले होते. परिसरात असलेले २ तलाव उन्हाळ्यात तळगाठत असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांच्या संत्रा बागा वाळून गेल्या. नाईलाजेने त्यांच्यावर कुऱ्हाड चालविण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपली. मात्र, काळे यांनी जराही खचून न जाता बोअरच्या माध्यमातून पाण्याचे योग्य नियोजन केले. पाणीही वेळेत मिळू लागल्याने संत्र्याला बार ही चांगला लागू लागला.

यंदा समाधानकारक भाव मिळाला असून, बंगळुरुच्या बाजारात या संत्र्याला सर्वाधिक जास्त मागणी असल्याचे काळे यांनी सांगितले. तसेच, संत्र्यामध्ये अंतर पीक म्हणून भाजीपाला वर्गीय पीक घेतात. भाजीपाला वर्गीय पिकासह संत्रा आणि पारंपरिक पीकातून वर्षाकाठी १० ते १२ लाखांचे उत्पन्न हमखास मिळत असल्याचे काळे म्हणतात. शेती ही अगदी नियोजन पद्धतीने केली तर हमखास उत्पन्न देते. शेतकऱ्यांनी मनात नकारात्मक भावना न आणता नीट नियोजन करून आणि जिद्दीने शेती केली तर शेतीत मोठे उत्पन्न मिळते याचे उदाहरण रामा काळे यांनी दिले आहे.

undefined

Intro:हिंगोली जिल्ह्यातील भांडेगाव येथे मोठ्या प्रमाणात मळे, तळे असल्याने हिंगोली परिसरात सदनशील गाव म्हणून भांडेगावंची ओळख आहे. मात्र तीन ते चार वर्षांपासून जिल्ह्यात अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने याचा फटका या भागातील फळ बागायत दराना झाला आहे. मात्र अशाही परिस्थितीत पाण्याचे अतिशय बारकाईने नियोजन करून जगविलेल्या संत्रा बागेमुळे शेतकऱ्याला दर वर्षी तीन ते चार लाखांचे उत्पन्न मिळण्यास मदत झाली असून, आता भांडेगावतल्या संत्र्याला बेंगलोरच्या बाजारपेठेत मागणी वाढली आहे.

Body:रामा काळे असे संत्रा उत्पादक शेतकऱ्याचे नाव आहे. काळे यांनी दोन एकरात सात वर्षांपूर्वी संत्र्याची १०० झाडे लावली. लागवड केली ती काळी मुबलक प्रमाणात पाणी होते. त्यामुळे झाडांची वाढ चांगल्या प्रकारे झाली. दुसऱ्याच वर्षीपासून संत्र्याचा बार लागला अन उत्पन्नास ही सुरुवात झाली. अगदी सुरुवातीला चा दीड ते पावणे दोन लाखाचा बागवणाने संत्र्याचा मळा मागितला. अनुभव नव्हता त्यामुळे तेच पैसे फार मोठे वाटू लागले. मात्र संत्र्यातूनाही लाखोंचे उत्पन्न मिळू शकते, एवढे पहिल्याच वर्षीपासून कळायला सुरुवात झाल्याचे काळे यांनी सांगितले. तेव्हापासून मात्र संत्रा उत्पादनात गोडी निर्माण झाली अन वर्षाला दोन ते अडीच लाख रुपये पदरात पडू लागले. मात्र मागील तीन ते चार वर्षांपासून जिल्ह्यात अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने अल्पशा पाण्यावर संत्रा बाग जगविणे चांगलेच जिकरीचे होऊन बसले आहे. परिसरात असलेले दोन तलाव देखील ऐन उन्हाळ्यात तळगाठत असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांच्या संत्रा बागा वाळून गेल्या, नाईलाजेने त्यांच्यवर कुऱ्हाड चालविण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपली. मात्र काळे यांनी जराही खचून न जाता एक बोअर घेतला अन बोअरचे पाणी विहिरीत साठवून ठेऊन ते पाच दिवस, चार दिवस आड संत्र्याला देण्यास सुरुवात केली. त्यामुळे १०० पैकी एकही झाड वाळले नाही. पाणीही वेळेत मिळू लागल्याने संत्र्याला बार ही चांगला लागू लागला, सुरुवातीपासून एक बागवान ही संत्र्याची बाग खरेदी करतो. विशेष म्हणजे ही संत्रे हिंगोली जिल्ह्यातच नव्हे तर थेट बेंगलोर च्या बाजारपेठत विक्रीस जातात. ही संत्रे एवढी गोड आहेत की एक संत्रा खाल्ल्यानंतर दुसरा संत्रा खाण्याची इच्छा होते. त्यामुळे दर वर्षीच चांगला भाव मिळत गेला.

Conclusion:या वर्षी तर आडीच ते तीन लाखा पर्यंत इतर बागवान मळ्याची मागणी करु लागले मात्र सुरुवाती पासूनच एकच बागवणाने मळा खरेदी करण्यास सुरुवात केल्याने त्याच्याकडूनच दरवर्षी काही तरी प्रमाणात वाढून भाव मिळत आल्याचे काळे यांनी सांगितले. यंदा ही समाधान कारक भाव मिळाला असून, बेंगलोरच्या बाजारात या संत्र्याला सर्वाधिक जास्त मागणी आल्याचे काळे म्हणतात. तसेच संत्र्या मध्ये अंतर पीक म्हणून भाजीपाला वर्गीय पीक घेतात. भांडेगाव पासून आठ ते दहा किलोमीटर अंतरराव हिंगोलीची भाजी मंडी असल्याने त्यातूनही जास्त उत्पन्न मिळू लागले. भाजीपाला वर्गीय पिकासह संत्रा अन पारंपरिक पीकातून वर्षाकाठी दहा ते बारा लाखांचे उत्पन्न हमखास मिळत असल्याचे काळे म्हणतात. शेती ही अगदी नियोजन पद्धतीने केली तर हमखास उत्पन्न देते, त्यामुळे शेतकऱ्यांनी मनात नकारात्मक भावना न आणता नियोजन पद्धतीने अन जिद्दीने शेती केली तर शेती ही उत्पन्न देणारी आहे. त्यामुळे डोक्यावरील कर्ज कमी करण्यास मदत होऊन आत्महत्या करण्याचा डोक्यात जराही विचार येणार नाही.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.