ETV Bharat / state

हिंगोली उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा विद्युत पुरवठा बील न भरल्याने खंडीत - bill

इमारतीत कामासाठी येणाऱ्यांची गैरसोय होणार नाही, याचे बारकाईने नियोजन केलेले आहे. मात्र, विद्युत महावितरण कंपनीच्यावतीने इमारतीचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे या ठिकाणी कामानिमित्त येणाऱ्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.

हिंगोली उपप्रादेशिक परिवहन कार्यालय
author img

By

Published : Mar 13, 2019, 4:38 AM IST

हिंगोली - कोट्यवधी रुपये खर्च करून हिंगोली येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची टोलेजंग इमारत उभारली आहे. नुकतेच कार्यालय नवीन इमारतीत स्थलांतरित झाले आहे. लगेचच ३२ हजार रुपयांच्या थकीत बिला पोटी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नवीन इमारतीचा विद्युत पुरवठा विद्युत विभागाने खंडित केला आहे. त्यामुळे येथे कामकाजासाठी येणाऱ्या लोकांची हेळसांड होत आहे.

संबंधित व्हिडीओ

औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या उपप्रादेशिक परिवहन विभाग कार्यालयाचे स्थलांतर काही दिवसांपूर्वी नवीन इमारतीमध्ये झाले आहे. या सुसज्ज इमारतीत सर्वच सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. इमारतीत कामासाठी येणाऱ्यांची गैरसोय होणार नाही, याचे बारकाईने नियोजन केलेले आहे. मात्र, विद्युत महावितरण कंपनीच्यावतीने इमारतीचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे या ठिकाणी कामानिमित्त येणाऱ्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे येथील कर्मचारीही थेट वीज भरणा न केल्याने विद्युत पुरवठा बंद असल्याचे सांगत सुटले आहेत. त्यामुळे याठिकाणी मोठ्या आशेने येणाऱ्या नागरिकांचा हिरमोड होत आहे. वास्तविक पाहता इमारत परिसरात, जनरेटरची सुविधा आहे. मात्र, तरीही हा विभाग महावितरणवरच का अवलंबून असेल, याचा काय अजून ताळमेळ लागलेला नाही. तर विद्युत पुरवठा नसल्याने गेल्या काही दिवसांपासून नागरिक खेटे घेत आहेत. शिवाय सर्वच कामे खोळबंली असून, कार्यालयाच्या बाहेर वाहनाच्या देखील लांबलचक रांगा लागलेल्या आहेत.

केवळ बिल भरणामुळे या कार्यालयातील विद्युत पुरवठा तोडला जात असेल तर याहून दुर्दैव कोणते? वीज या इमारतीचे काम करणाऱ्या गुत्तेदारांनी कामासाठी वापरलेली आहे. त्यामुळे त्या गुत्तेदारांनी हे बिल भरणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी भरले नाही, बिल भरण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार यांनी सांगितले. तर गुत्तेदारांच्या प्रतीक्षेत दिवस लोटले जात असल्याने, येथे येणाऱ्यांची चांगलीच तारांबळ होत आहे. सोबतच भव्य टोलेजंग इमारतीत अंधकार पसरला आहे.

Intro:कोट्यवधी रुपये खर्च करून हिंगोली येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची टोले जंग इमारत उभारली केली आहे. नुकतेच कार्यालय या इमारतीत स्थलांतरित झालें असून, नेमकीच कामकाला सुरुवात करताच. विधुत वितरण विभागाने ३२ हजार रुप्याच्या थकीत बिला पोटी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नवीन इमारतीचा विद्युत पुरवठा खंडित केलाय. त्यामुळे येथे कामकाजा निमित्त येणाऱ्यांच्या चांगलीच हेळसांड होत आहे.

Body:हिंगोली येथील औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या उपप्रादेशिक परिवहन विभाग कार्यालयाचे स्थलांतर काही दिवसापूर्वी नवीन इमारतीमध्ये झाले आहे. ही इमारत एवढी सुसज्ज बनवण्यात आलेली आहे की त्या ठिकाणी सर्वच सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत एवढेच नव्हे तर अगदी नियोजनबद्ध बनवलेला इमारतीत लायसन काढण्यासाठी येणाऱ्यांची जराही गैरसोय होणार नाही याचे बारकाईने नियोजन केलेले आहे. सर्वच सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या असल्या तरीही नुकतेच कार्यालयीन कामकाज सुरू होऊन काही दिवस लोटतात नाही तोच अचानक पणे विद्युत वितरण महा कंपनीच्या वतीने या इमारतीचा विद्युत पुरवठा खंडित केला जातोय. त्यामुळे या ठिकाणी कामानिमित्त येणाऱ्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे विशेष म्हणजे येथील कर्मचारीही थेट वीज भरणा न केल्याने विद्युत पुरवठा बंद असल्याचे सांगत सुटले आहेत. त्यामुळे याठिकाणी मोठ्या आशेने येणाऱ्या नागरिकांचा हिरमोड होत आहे. वास्तविक पाहता इमारत परिसरात, जनरेटर ची ही सुविधा आहे. मात्र तरीही हा विभाग महावितरण वर च का अवलंबून असेल याचा काय अजून ताळमेळ लागलेला नाही. मग हा जेसेट काय देखवाच आहे की काय? असा सवाल येथे कामा निमित्त येणारे नागरिक करीत आहेत. तर या ठिकाणी विधुत पुरवठा च नसल्याने पाच ते चार दिवसांपासून नागरिक खेटे घेत आहेत, शिवाय सर्वच कामे खोळबंली असून, कार्यालयाच्या बाहेर वाहनाच्या देखील लांबलचक रांगा लागलेल्या आहेत.

Conclusion:फाईव्ह टॉप टेन मध्ये हा विभाग मोडतो, तरी देखील केवळ बिल भरणा पाई विधुत पुरवठा तोडला जात असेल तर याहून दुर्दैव कोणते? ही विद्युत इमारतीचे काम करणाऱ्या गुत्तेदारानी कामासाठी वापरलेली आहे. त्यामुळे त्या गुत्तेदारानी हे बिल भरणे अपेक्षित होते. मात्र त्यानी भरले नाही, बिल भरण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार यांनी सांगितले. मात्र गुत्तेदाराच्या प्रतीक्षेत दिवस लोटले जात असल्याने, येथे येणाऱ्यांची चांगलीच तारांबळ होत आहे. सोबतच भव्य टोलेजंग इमारतीत अंधकार पसरला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.