हिंगोली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि मालेगाव येथे बंदोबस्तासाठी हिंगोलीतून राज्य राखीव पोलीस बल क्रमांक १२ च्या दोन तुकड्या गेल्या होत्या. त्या परतल्यानंतर त्यांची तपासणी करून त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून क्वारंटाईन करण्यात आले आहे. यासंबंधी माहिती समादेशक मंचक ईप्पर यांनी दिली आहे.
मुंबई आणि मालेगाव येथे कोरोनाच्या रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे हे कोरोनाचे हॉटस्पॉट मानले जात आहे. त्याठिकाणी बंदोबस्तासाठी हिंगोलीतून राज्य राखीव पोलीस बलाच्या दोन तुकड्या गेल्या होत्या. यामध्ये एकूण २७३ जवान आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता. बंदोबस्त करून या तुकड्या हिंगोली येथे परतल्या आहेत. त्यांची तपासणी करून त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. हिंगोलीत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.