ETV Bharat / state

धक्कादायक..! कोरोना वार्ड परिसरात वापरलेले मास्क, ग्लोज उघड्यावर फेकले - जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली

हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयात असलेल्या कोव्हिड वार्ड परिसरात, वापरलेले मास्क आणि ग्लोज इतरत्र फेकून दिलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. या धक्कादायक प्रकारामुळे रुग्णालय परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

Some are throwing their used masks, gloves right on the hingoli civil hospital area
धक्कादायक..! वापरलेले मास्क, ग्लोज कोरोना वार्ड परिसरात उघड्यावर फेकले
author img

By

Published : Jul 14, 2020, 2:13 PM IST

हिंगोली - येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात असलेल्या कोव्हिड वार्ड परिसरात, वापरलेले मास्क आणि ग्लोज इतरत्र फेकून दिलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. या धक्कादायक प्रकारामुळे रुग्णालय परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. तर दुसरी बाब म्हणजे, कोरोना बाधित रुग्णांना देण्यात येणारे भोजन देखील निकृष्ट दर्जाचे असल्याची बाब समोर आली आहे. जेवणाचा दर्जा सुधारण्यासह परिसरात अस्ताव्यस्त फेकून दिलेले मास्क, ग्लोज गोळा करण्याच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सक किशोर श्रीवास यांनी दिल्या आहेत.

कोरोनाचा सामना करण्यासाठी कोरोना योध्ये दिवसरात्र परिश्रम घेत आहेत. मात्र कोव्हिड वार्ड परिसरात फेकून देण्यात आलेल्या मास्क आणि ग्लोजमुळे परिसरात भिती निर्माण झाली आहे. आयुक्त हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येणार असल्याची कल्पना असती तर कदाचित कोव्हिड वार्डमध्ये सर्व काही ठीक-ठाक करून ठेवण्यात आले असते. मात्र अचानक आयुक्ताने हिंगोली जिल्ह्याला दिलेल्या भेटीत रुग्णालयातील बिंग फुटले. परिसरात ठिकठिकाणी मास्क पडले होते. या सर्व प्रकाराने रुग्णालयातील साफ सफाईचे बिंग फुटले. त्यात कोरोना रुग्णास दिले जाणारे जेवण निकृष्ट दर्जाचे होते हे समोर आले. त्यामुळे जेवणाचा दर्जा सुधारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कोरोना वार्ड परिसरात वापरलेले मास्क, ग्लोज उघड्यावर फेकले...
खाजगी रुग्णालयाची ही माहिती तयार ठेवा - दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. येणाऱ्या कालावधीत कोरोनाचे संकट वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आता पासून नियोजन करण्याच्या सुचना दिल्या असून, वाढत्या रुग्णासाठी खाटांची संख्या वाढविण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांची माहिती तयार ठेवा. तसेच तेथील खाटांची शिवाय पाणी, वीज आणि स्वच्छता गृहाची उपलब्धता आहे का? याची माहिती घेऊन वापरात नसलेल्या इमारतीची देखील पाहणी करून ठेवण्यात यावी. कोरोना बाधित रुग्णांना ऑक्सिजनची नितांत गरज असल्याने रुग्णाला ऑक्सिजन मिळावा म्हणून, प्राथमिक उपचार कक्षात ऑक्सिजनची व्यवस्था करावी. आदी संदर्भात प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.

हेही वाचा - पाच मिनिटांत येतो, असे सांगून गेलेला अधिकारी परतलाच नाही, तेव्हा महिला शिक्षण सभापतींनी ऑफिसमध्येच ठोकला मुक्काम

हेही वाचा - विभागीय आयुक्त केंद्रेकरांच्या दौऱ्याने शासकीय यंत्रणेची धांदल, सर्वकाही 'इशारो इशारो में'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.