हिंगोली - जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे सूर्यग्रहण पाहता येणार की नाही, अशी शंका होती. सुरुवातीला ग्रहण दिसले नाही. मात्र, काही वेळानंतर सूर्यग्रहण पाहता आले. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी देखील सोलर फिल्टर चष्म्यामधून सूर्यग्रहण पाहिले.
देशात आज सकाळी ८ वाजून ९ मिनिटांनी सूर्यग्रहण दिसणार होते. त्यानुसार अनेकांनी सूर्यग्रहण पाहण्याची तयारी केली होती. विद्यार्थ्यांना सूर्यग्रहण पाहता यावे यासाठी शाळेच्यावतीने सोलर फिल्टर चष्म्याची व्यवस्था केली होती. तसेच शहरातील मध्यभागी असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर देखील शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांनी सूर्यग्रहण पाहिले. तसेच काहींनी हा क्षण कॅमेऱ्यामध्ये देखील कैद केला.