ETV Bharat / state

भावाच्या मृत्यूचे दुःख बाजुला सारत बहिण गंगा पोहोचली परीक्षा केंद्रावर..

हिंगोलीत भावाच्या मृत्यूचे दु:ख बाजुला सारून बहिण गंगाने विज्ञानाचा पेपर दिला. ती पेपर देऊन घरी येईपर्यंत मृतदेह घरात ठेवण्यात आला होता.

sister-gave-his-ssc-exam-paper-even-after-his-brother-died
भावाच्या मृत्यूचे दुःख बाजुला सारून बहीण गंगाने दिला विज्ञानाचा पेपर
author img

By

Published : Mar 16, 2020, 6:08 PM IST

हिंगोली - एकीकडे भविष्याचा प्रश्न तर दुसरीकडे भावाच्या मृत्यू बद्दल मनात संशयाचे काहूर.. यातून स्वत:ला सावरत गंगा नावाच्या विद्यार्थिनीने इयत्ता दहावीचा पेपर सोडवण्यासाठी परीक्षा केंद्र गाठले. तिच्या नातेवाईकांनीही तिला भावाचा मृत्यू झाल्याची जराही जाणीव होऊ दिली नाही. मात्र, घरातील हालचाली तिला संशयास्पद वाटू लागल्या. तोपर्यंत पेपरची वेळ झाली होती. अन गंगा पेपरला पोहोचली. ती घरी येईपर्यंत भावाचा मृदेह घरात ठेवण्यात आला होता.

गौरव अनिल खंदारे या 14 वर्षीय मुलाचा आज पहाटे डेंग्यूच्या आजाराने मृत्यू झाला. ज्याच्या सोबत लहान पानापासून खेळले बागडले, तोच भाऊ आज अचानक पणे सोडून गेला. मात्र, पुढे भविष्य होते. त्यामुळे स्वतःच्या काळजावर दगड ठेवून गंगा परीक्षा केंद्रावर पोहोचली. तिच्यासोबत तिचे नातेवाईक होते. आज मात्र रोज सोबत येणारे वडील परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी आले नाहीत. त्यामुळे गंगाला दुःख तर होते. मात्र, वडिलांनी ही गंगाला काहीच समजू नये म्हणून हुंदके दाबत परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक दिला आणि पेपर चांगला सोडविण्याचे ही सांगितले. गंगा ही आपल्या वडिलांच्या आदेशाचे पालन करत आपल्या नातेवाईकांसोबत पेपरला पोहोचली.

गंगा पेपर सोडून येईपर्यंत गौरवचा अंत्यविधी थांबविण्यात आला होता. भावाची ताटातूट झाल्याने सर्वांनीच हळहळ व्यक्त केली. जेव्हा आई घरामध्ये रडत रडत आली होती, तेव्हा काहीतरी अनुचित घडल्याचे गंगाला जाणवले पण तिला काहीही लक्षात येऊ नये म्हणून आईने देखील आपले डोळे पदराने पुसले आणि घरून ताबडतोब गावाकडे काढता पाय घेतला. गंगा पेपरच्या धावपळीत ही भावाची प्रकृती विचारायची अजिबात विसरली नाही, पण आईने ठीक आहे एवढेच सांगितले.

गंगा जेव्हा पेपरवरून घरी पोहोचली तो बाहेर गोळा झालेली नातेवाईकांची गर्दी पाहून घाबरून गेली. जवळ जातेय तर काय भाऊ निपचित पडलेला. तोच गळ्यात पडून जोर जोरात रडत होती, भाऊ बहिणीचे हे अतूट प्रेम पाहून सर्वांच्याच डोळ्याला धारा लागल्या होत्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.