ETV Bharat / state

हिंगोलीतील सिद्धेश्वर धरण तेरा वर्षात पहिल्यांदाच भरले

गेल्या पाच सहा वर्षांपासून जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. मात्र, परतीच्या पावसामुळे तेरा वर्षांत पहिल्यांदाच सिद्धेश्वर धरण भरले आहे.

author img

By

Published : Nov 30, 2019, 9:52 AM IST

siddheshwar dam filed first time in last thirteen years
हिंगोलीतील सिद्धेश्वर धरण तेरा वर्षात पहिल्यांदाच भरले

हिंगोली - गेल्या पाच सहा वर्षांपासून जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. मात्र, परतीच्या पावसामुळे तेरा वर्षांत पहिल्यांदाच सिद्धेश्वर धरण भरले आहे. हे धरण भरल्यामुळे हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरत आहे.

हेही वाचा - धुळ्यात पुलावरून पिकअप खाली पडली; 7 जणांचा मृत्यू, 25 जखमी

या धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. तिनही जिल्ह्यातील सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा ही प्रश्न सुटण्यास यामुळे मदत होणार आहे. हिंगोली जिल्ह्यात दर वर्षी कमाी पर्जन्यमानामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याची समस्या असते. मात्र, यावर्षी पूर्णा नदीवर उभारलेले येलदरी आणि खडकपूर्णा धरण परतीच्या पावसाने शंभर टक्के भरले आहे. याच धरण साखळीतील औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरण देखील शंभर टक्के भरले आहे.

यंदा खरीप हंगाम हातचा निघून गेल्यामुळे या हंगामातील उणीव भरून काढण्यासाठी रब्बी हंगामात याची मदत होणार आहे. हरभरा, गहू यासह रब्बीच्या इतर पिकांची शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. सिद्धेश्वर धरण ते सिद्धेश्वर गावापर्यंत असलेला सांडवा हा दुथडी भरून वाहत असल्याने सांडव्याला धबधब्याचे स्वरूप आले आहे. त्यामुळे या भागात मागील काही दिवसांपासून पर्यटकांची गर्दी होत आहे. सोबतच परिसरातील नदी नाले हे दुथडी भरून वाहत असल्यामुळे या भागातील ग्रामस्थांना गाव गाठण्यासाठी कोसो दूर पायपीट करावी लागत आहे. दुथडी भरून वाहत असलेल्या नदी, नाल्यांमुळे परिसरातील ग्रामस्थांना प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा दिला आहे.

हेही वाचा - हीच ती वेळ ; महाविकासआघाडीला आज पेलवावे लागणार बहुमताचे 'शिवधनुष्य'

औंढा नागनाथ वसमत तालुक्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत झाली आहे. विशेष म्हणजे याच धरणाचे पाणी हे नांदेड जिल्ह्यालाही जात असल्याने या भागातील पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे. जवळपास २०१२ पासून अपुऱ्या पाण्यामुळे हे धरण भरलेच नव्हते. मात्र, यंदा परतीच्या पावसाने या धरणांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे जवळपास दोन वर्षे तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. धरण परिसरातील गावात बोरवेल तसेच विहिरींची पाणी पातळी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनाही यंदाचा रब्बी हंगाम समाधानकारक उत्पन्न देणारा ठरणार आहे.

Intro:गेल्या पाच ते सात वर्षात हिंगोली जिल्ह्यात अत्यल्प पर्जन्यमान होत असल्याने, शेतकरी तर हतबल झालेतच त्याहूनही गंभीर प्रश्न निर्माण होत होता तो पाण्याचा, मात्र तेरा वर्षात पहिल्यांदाच भरलेलं सिद्धेश्वर धरण हे हिंगोली, परभणी अन नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी खरोखरच संजीवनी ठरत आहे. खरीप मधून कसा बसा सावरलेला बळीराजाला धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळं फायदा होणार आहे. तिनही जिल्ह्यातील सिंचन अन पिण्याच्या पाण्याचा ही प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

Body:हिंगोली जिल्ह्यात दर वर्षीच पाण्याची बोंबाबोंब असते मात्र या वर्षी पूर्णा नदीवर उभारलेले येलदरी व खडकपुर्णा धरण परतीच्या पावसाने शंभर टक्के भरले त्यामुळे नदीपात्रात सुरु असलेल्या विसर्गामुळे औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरण देखील शंभर टक्के भरले आहे. खरंतर मागील तेरा वर्षापासून पहिल्यांदाच सिद्धेश्वर धरण शंभर टक्के भरल्यामुळे शेतकऱ्यांना खरोखरच उपयोगी ठरणार आहे. यंदा खरीप हंगाम हातचा पूर्ण निघून गेल्यामुळे या हंगामातील उणीव भरून काढण्यासाठी रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी सर्वाधिक जास्त लक्ष घातले आहे. हरभरा गहू यासह रबीची इतर पिकांची शेतकऱ्यांनी पेरणी केलीय. त्या पिकासाठी विसर्ग होत असलेल्या पाण्याचा सर्वाधिक जास्त उपयोग होत आहे. सिद्धेश्वर धरण ते सिद्धेश्वर गावापर्यंत असलेल्या सांडवा हा दुथडी भरून वाहत असल्याने सांग याला धबधब्याचे स्वरूप आले आहे त्यामुळे या भागात मागील काही दिवसापासून पर्यटकांची गर्दी होत आहे. सोबतच परिसरातील नदी नाले हे दुथडी भरून वाहत असल्यामुळे या भागातील ग्रामस्थांना गाव गाठण्यासाठी कोसो दूर पायपीट करावी लागत आहे. दुथडी भरून वाहत असलेल्या नदी, नाल्या मुळे परिसरातील ग्रामस्थांना प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Conclusion:औंढा नागनाथ वसमत तालुक्यातील शेती शिक्षणाबरोबरच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत झाली आहे विशेष म्हणजे याच धरणाचे पाणी हे नांदेड जिल्ह्यालाही जात असल्याने, या भागातील ही पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. जवळपास 2012 पासून अपुऱ्या पाण्यामुळे हे धरण भरलेच नव्हते. मात्र यंदा परतीच्या पावसाने या धरणांमध्ये शंभर टक्के पाणी साठलेय. त्यामुळे जवळपास दोन वर्षतरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. मुख्य म्हणजे धरण परिसरातील गावात बोरवेल तसेच विहिरींची पाणी पातळी देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांनाही यंदाचा रब्बी हंगाम आहा समाधानकारक उत्पन्न देणारा ठरणार आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.