ETV Bharat / state

व्हिडीओ : हिंगोलीत रेशन दुकानदारचा मुजोरपणा; नियमानुसार धान्य देण्यास नकार - हिंगोली

गोरेगावच्या गांधीनगर भागातील रेशन दुकानदाराने एका लाभार्थ्याला या महिन्याच्या रेशनची पावती दिली. तर पुढील महिन्यात घेऊन जाण्यास सांगितले.

व्हायरल व्हिडीओ
author img

By

Published : May 21, 2019, 3:23 PM IST

हिंगोली - गोरेगावच्या गांधीनगर भागातील रेशन दुकानदाराने एका लाभार्थ्याला या महिन्याच्या रेशनची पावती दिली. तर पुढील महिन्यात घेऊन जाण्यास सांगितले. त्यानंतर लाभार्थ्याने बाहेर बसलेल्या प्रतिष्ठित मंडळींनी ही गोष्ट सांगितल्यानंतर दुकानदाराला समजूत घालत धान्य देण्याची विनंती केली. मात्र, दुकानदार कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. या सर्व गोंधळाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल व्हिडीओ

विठ्ठल मगर (गांधीनगर, गोरेगाव तालुका सेनगाव) हे या दुकानदाराकडे एक नव्हे तर 4 ठिकाणांच्या रेशन वाटप करण्याची परवानगी आहे. सोमवारी संजय गिरे हे लाभार्थी गोरेगाव येथील रेशन दुकानात धान्य आणण्यासाठी गेले. त्यावेळी दुकानदाराने त्यांचा ई- पॉस मशीनवर त्यांचा अंगठा घेतला. गिरे हे धान्य घेण्यासाठी ते पिशवी घेऊन समोर आले. त्यावेळी दुकानदाराने ही पावती घेऊन पुढीच्या महिन्यात धान्य घेण्यासाठी या, असे सांगितले. तेव्हा लाभार्थी गोंधळून गेला व त्यांने हा सर्व बाहेरील नागरिकांना सांगितला.

नागरिकांनी लाभार्थ्यांस नियमानुसार दुकानदारास धान्य देण्यास सांगितले. मात्र, दुकानदाराने स्पष्ट नकार दिला. त्यामुळे हा प्रकार तलाठी अन मंडळ अधिकारी यांना सांगितला. त्यांनीही दुकानदाराला धान्य देण्यासाठी सांगितले. तरीही दुकानदार ऐकत नव्हता त्यावेळी शेवटी मंडळ अधिकाऱ्याने नायब तहसीलदार अशोक भोजने यांच्याशी फोनवरून संपर्क साधत सर्व प्रकार सांगितला. नायब तहसीलदारांनी दुकानदारास रेशन देण्याचे आदेश दिले. तरीही दुकानदार कोणाचे एक ऐकत नव्हता. तसेच तो मी तर रेशन देत नाही, तुम्हीच येऊन रेशन वाटप करा, असे तहसीलदारांना बोलत होता.

विशेष म्हणजे 4 महिन्यांपूर्वी लाभार्थ्यांच्या तक्रारीवरून या दुकांदाराची तक्रार वरिष्ठांकडे करण्यात आली होती. मात्र, त्यामध्ये काहीच कारवाई झाली नाही. एवढेच नव्हे तर फोनवर खडाजंगी झालेले नायब तहसीलदार भोजने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दुकानदाराच्या बोलण्याचीच सारवा-सारव केली. त्यामुळे आता याप्रकरणी जिल्हाधिकारी लक्ष घालणार का? आणि दुकानदारावर कोणती कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्याने 11 नोव्हेंबर 2018 रोजी केलेल्या चौकशीत या दुकानांमध्ये अनियमिता आढळून आली होती. तसा अहवालच नागरिकांच्या समक्ष 6 महिन्यापूर्वी वरिष्ठाकडे पाठविला होता. मात्र, 6 महिने उलटूनही याप्रकरणी कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही.

Intro:रेशनचे धान्य काळ्या बाजारात पळविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या हिंगोली जिल्ह्यात रेशनच्या बाबतीत ऐकावे ते नवलच आहे. विशेष करून सेनगाव तालुक्यात रेशनच्या बाबतीत सर्वाधिक गोंधळ सुरू आहे. आता तर गोरेगावच्या एका रेशन दुकानदाराने एका लाभार्थ्याला रेशनची पावती काढून हातात ठेवत धान्य घेऊन जाण्यासाठी पुढच्या महिन्यात येण्याच्या सूचना देत नियमाच्या सर्व सीमाच पार केल्यात. या प्रकाराने गोंधळून गेलेल्या लाभार्थ्यांने बाहेर बसलेल्या प्रतिष्ठित मंडळींच्या कानावर ही बाब सांगितली. त्यांनी धाव घेत दुकानदाराला समजूत घालत धान्य देण्यासाठी विनंती करीत होते मात्र तो कुणाच्या ही ऐकण्याच्या अजिबात मनस्थितीत नव्हता. याचा व्हिडिओ व्हायरल झालाय.

Body:सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील गांधीनगर भागातील रेशन दुकानदार विठ्ठल मगर हे रेशन च्या बाबतीत मागील चार महिन्यांपासून जरा जास्तच चर्चेत आलेत. चर्चेत आलेल्या या दुकानदाराकडे केवळ एकाच नव्हे तर चार- चार ठिकाणचे रेशन वाटप करण्याची परवानगी आहे. सोमवारी गोरेगाव येथे संजय गिरे हे दुकानावर धान्य आणण्यासाठी गेले. दुकानदाराने त्यांचा ई- पॉस मशीनवर अंगठा घेतला अन धान्य घेण्यासाठी ते पिशवी घेऊन समोर गेले. तर दुकानदाराने गिरे यांना थांबवत ' ही पावती घेऊन तुम्ही पुढील महिन्यात धान्य घेण्यासाठी या' असे सांगितल्याने लाभार्थी गोंधळून जात बाहेर हा प्रकार सांगितला. नागरिकांनी त्या लाभार्थ्यांस सोबत नेत नियमानुसार धान्य देण्याचे सांगितले. मात्र दुकानदाराने स्पष्ट नकार दिला. त्यामुळे हा प्रकार तलाठी अन मंडळ अधिकारी यांना सांगितला. त्यांनी ही दुकानदाराला धान्य देण्यासाठी सांगितले मात्र त्याला ही दुकानदार सूनावत होता. शेवटी मंडळ अधिकाऱ्याने नायब तहसीलदार अशोक भोजने यांच्याशी फोनवरून संपर्क साधत सर्व परिस्थिती सांगितली अन दुकानदाराला बोलण्यास सांगितले. नियमानुसार रेशन देण्याचे आदेश नायब तहसीलदार दुकानदारास आदेश देत होते मात्र दुकानदार त्यांचे काहीही ऐकण्याच्या मनस्तीत नव्हते. उलट दुकानाबाहेर जमलेल्या नागरिका समोरच एका सर्वसामान्य व्यक्तीसारखे बोलत होता. या प्रकाराने तर नागरिक अधिकच चक्रावले होते. एवढेच नव्हे तर 'मी तर रेशन देत नाही तुम्हीच येऊन रेशन वाटप करा' आशा सूचनाही दुकानदार देत होता. यावरून दुकांदाराचा मुजोर पणा नागरिकांसमोर उघड झाला तो ही नायबतहसीलदारासोबत बोलताना. तर हा दुकानदार लाभार्थ्यांना कसली वागणूक देत असेल हे दुसऱ्या शब्दात सांगण्याची अजिबात गरज नाही.

Conclusion:विशेष म्हणजे चार महिन्यांपूर्वी लाभार्थ्यांच्या तक्रारीवरून या दुकांदाराचा तक्रार ही वरिष्ठांकडे केली होती, मात्र त्यामध्ये काहीच कारवाई झाली नाही. एवढेच नव्हे तर फोनवर खडाजंगी झालेले नायब तहसीलदार भोजने यांच्याशी संपर्क साधला असता तर ते म्हणतात की त्या दुकांदाराचे बोलनेचग तसे आहे. तो साधा जर बोलत असेल तर तो रागावून बोलल्या सारखाच वाटत असल्याची दुकांदाराच्या बोलण्याची सारवा सारव करीत होते. यावरून दुकानदार अन अधिकऱ्यामध्ये काही तरी हितसंबंध असल्याची दाट शक्यता नागरिक वर्तवित होते. आता जिल्हाधिकारी या प्रकरणात काय लक्ष देणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

११ नोव्हेंबर २०१८ रोजी तलाठी अन मंडळ अधिकाऱ्याने केलेल्या चौकशीत दुकानांमध्ये अनियमिता आढळून आली होती. तसा अहवालच नागरिकांच्या समक्ष सहा महिन्यापूर्वी वरिष्ठाकडे पाठविला होता, मात्र सहा महिने उलटूनही यामध्ये कोणतीच कारवाई केलेली नाही.ही खळबळजनक बाब ही कालच्या प्रकाराने उघड झाली.

व्हायरल व्हिडीओ ftp केला आहे वरील sulug नेमणे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.