हिंगोली - हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी १७ व्या शतकात या महाराष्ट्रात भूमीपुत्रांचे हिंदवी स्वराज्य स्थापन केले होते. परकीय आणि स्वकीय अशा जुलमी सत्ताधीशांशी अनेक लढाया व युध्दे लढून या महाराष्ट्राच्या भूमीत स्वराज्याची निर्मिती केली. महाराष्ट्रातील सर्व जनतेला, नवीन पिढीला छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या कार्याविषयी, जीवनाविषयी माहिती व्हावी. तसेच महाराजांचे विचार, आदर्श, स्वराज्यप्रेम हे कायम जनतेच्या मनात राहावे हीच आपल्या सर्वांची प्रेरणा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या आदर्शानूसार आपण नवीन महाराष्ट्र घडवूया, अशा शुभेच्छा संदेशाद्वारे पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी याप्रसंगी दिल्या.
येथील जिल्हा परिषदेच्या प्रांगणात शिवस्वराज्य दिनानिमित्त जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारुन अभिवादन केले.
जिल्हा परिषदेच्या प्रांगणात शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारुन शिवस्वराज्य दिन साजरा - हिंगोली
हिंगोली जिल्हा परिषदेच्या प्रांगणात शिवस्वराज्य दिनानिमित्त जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारुन अभिवादन केले.