ETV Bharat / state

काँग्रेसचे तळ्यात-मळ्यात; शिवसेनेला मिळेना उमेदवार - मंत्री सूर्यकांता पाटील

भाजपकडे सातवांना झुंज देणाऱ्या माजी मंत्री सूर्यकांता पाटील, माजी खासदार अन् माहूर गडाचे योगी शाम भारती, असे दिग्गज इच्छूक आहेत. तर शिवसेनेला जागा निश्चित असतानाही सातव यांच्यापुढे तगडा उमेदवारच अद्यापही मिळालेला नाही. त्यामुळे शिवसेनेवर उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे.

राजीव सातव
author img

By

Published : Mar 15, 2019, 9:45 PM IST

हिंगोली - लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजलेले असतानाही हिंगोली मतदार संघात मात्र बहुजन वंचितचा उमेदवार सोडला तर कोणत्याच पक्षाच्या उमेदवाराचे नाव जाहीर झालेले नाही. त्यातच काँग्रेसचे राजीव सातव यांचे तळ्यात मळ्यात आहे. तर शिवसेनेला जागा निश्चित असतानाही सातव यांच्यापुढे तगडा उमेदवारच अद्यापही मिळालेला नाही. त्यामुळे शिवसेनेवर उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे.

हिंगोली लोकसभा निवडणुकीकडे अख्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. शिवसेनेकडे राजीव सातव यांना झुंज देणारा नेता शोधून सापडलेला नाही. भाजपकडे सातवांना झुंज देणाऱ्या माजी मंत्री सूर्यकांता पाटील, माजी खासदार अन् माहूर गडाचे योगी शाम भारती, असे दिग्गज इच्छूक आहेत. विशेष म्हणजे या मतदार संघात सिंचन वगळता, रस्ते, वीज ही कामे झालीत. त्यामुळे काही प्रमाणात का होईना ? भाजपसाठी हिंगोली लोकसभा मतदार संघात अनुकूल वातावरण आहे.
हिंगोली मतदार संघात काँग्रेसचे राजीव सातव यांनी किती विकास कामे केली, तसेच कोणत्या मतदारांच्या भेटी घेतल्या हादेखील एक संशोधनाचा विषय आहे. विशेष म्हणजे सातव यांच्यावर गुजरात प्रभारीपदाची जबाबदारी दिल्यानंतर त्यांची मतदार संघातील पकड हळूहळू कमी होत चालली आहे. त्यामुळेच सातव यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

हिंगोलीचे माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्यासोबत सातवांचे संबंध सर्वश्रृत आहेत. मागील काळात तर स्थानिक संस्थेच्या निवडणुका पाहता नगरपालिका आणि पंचायत समित्यांमध्ये तर शिवसेनेने काँग्रेसला धूळ चारली. तर औंढा नागनाथ नपमध्ये शिवसेना-भाजपची सत्ता आहे. तर सेनगाव अन् हिंगोली आघाडीच्या ताब्यात असली, तरीही माजी आ. भाऊराव पाटील यांचाच बोलबाला आहे. एकंदरित जिल्ह्यात शिवसेनेचे स्थानिक स्वराज्य संस्थेवर दबदबा आहे. मात्र जिल्ह्याचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत काँगेस-राष्ट्रवादीसोबत सत्तेसाठी केलेली अभद्र युती अन् सुरू असलेला आलबेल कारभार जिल्ह्यात चर्चेत आहे.

शिवसेनेच्या महिला सदस्यांच्या पतीने एका अधिकाऱ्याला केलेली मारहाण अन् काँग्रेसचे आमदार डॉ. संतोष टारफे यांच्या खासगी स्वीय सहाय्यकास निवेदनावरून केलेली मारहाण, या दोन घटना अजूनही जनतेच्या लक्षात आहेत. वसमतचे शिवसेना आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा यांच्यात मागील काळात जि. प.च्या कारभारातील हस्तक्षेपही चांगलाच महागात पडणार आहे. सध्या तरी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेत दोन गट पडल्याचे पहावयास मिळते. एक गट पत्रकार परिषदा घेऊन हिंगोलीचाच उमेदवार अन्यथा बंडखोरीची भाषा बोलत आहे. तर दुसरा गट माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्या समर्थनात मातोश्रीपर्यंत लॉबिंग करीत असल्याची चर्चा मतदार संघात सुरू आहे. त्यातच लोकसभेसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या एका बंजारा नेत्याला एका महामंडळाचे पद देऊन चिडीचूप करण्यात आले आहे. एवढी परिस्थिती असूनही शिवसेनेला अद्याप सातव यांच्यासारख्या खासदाराला टक्कर देण्यासाठी सक्षम उमेदवारच भेटला नाही ? याची जोरदार चर्चा मतदार संघात सुरू आहे.

Intro:लोकसभा निवडणुकीच्या बिगुल वाजलेले तानाही हिंगोली मतदार संघात मात्र बहुजन वंचितचा उमेदवार सोडला तर कोणत्याच पक्षाचा उमेदवाराचे नाव जाहीर झालेले नाही. त्यातच काँग्रेसचे राजीव सातव यांचे तळ्यात मळ्यात असल्याने अन शिवसेनेला जागा निश्चित असतानाही सातवाला कडवी झुंज देणारा उमेदवारच अख्या लोकसभा मतदार संघात शिवसेनेला अजून मिळालेला नाही. त्यामुळे शिवसेनेकडे जागा असतानाही निश्चितिसाठी उशीर का? याचीच चर्चा हिंगोली मतदार संघात जोरदार रंगतेय.

Body:हिंगोली लोकसभा निवडणुकीकडे अख्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. शिवसेनेकडे सातवाना झुंज देणारा नेता शोधून सापडलेला नसताना मात्र भाजप कडे सातवांना झुंज देणाऱ्या माजी मंत्री सूर्यकांता पाटील, माजी खासदार अन एक वकील, त्याच बरोबर माहूर गडाचे योगी शाम भारती असे दिगग्ज आहेत. विशेष म्हणजे या मतदार संघात सिंचन वगळता, रस्ते, वीज ही कामे झालीत. त्यामुळे काही प्रमाणात का होईना? भाजप साठी हिंगोली लोकसभा मतदार संघात अनुकूल वातावरण आहे. मात्र जागाच शिवसेनेला सुटल्याने शिवसेनेने मोठा हट्टास धरलेला आहे.
हिंगोली मतदार संघात काँग्रेसचे राजीव सातव यांनी किती विकास कामे केली, तसेच कोणत्या मतदारांच्या भेटी घेतल्या हा देखील एक संशोधनाचा विषय आहे. विशेष म्हणजे सातव यांच्यावर गुजरात प्रभारी पदाची जबाबदरी दिल्यानंतर त्यांची मतदार संघातील पकड हळूहळू कमी कमी होत चालली आहे. त्यामुळेच सातव याना त्यांच्याच बाल्य किल्ल्यात तारेवरची कसरत क्रावू लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच हिंगोलीचे माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावक यांच्या सोबत सातवांचे सबंध सर्वश्रुत आहेत. मागील काळात तर स्थानिक संस्थेच्या निवडणुका पाहता नगरपालिका आणि पंचायत समित्या मध्ये तर शिवसेनेने काँग्रेसला धूळ चारली. तर औंढा नागनाथ नप मध्ये शिवसेना- भाजप विराजमान आहे. तर सेनगाव अन हिंगोली आघाडीच्या ताब्यात असली तरीही माजी आ. भाऊराव पाटील यांचाच बोलबाला आहे. एकंदरीत जिल्ह्यात शिवसेनेचे स्थानिक स्वराज्य संस्थेवर दबदबा आहे. मात्र जिल्ह्याचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत काँगेस- राष्ट्रवादी सोबत सत्तेसाठी केलेली अभद्र युती अन सुरू असलेला आलबेल कारभार जिल्ह्यात चर्चेचा आहे.

Conclusion:तर शिवसेनेच्या महिला सदस्यांच्या पतीने एका अधिकाऱ्याने केलेली मारहाण अन काँग्रेसचे आमदार डॉ. संतोष टारफे यांच्या खाजगी स्वीयसाह्यकास निवेदनावरून केलेली मारहाण. या दोन घटना अजून ही जनतेच्या लक्षात आहेत. तर वसमतचे शिवसेना आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा यांच्यात मागील काळात जिप च्या करभरातील हस्तक्षेप ही चांगलाच महागात पडणार आहे. सध्या तरी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेत दोन गट पडल्याचे पहावयास मिळते. एक गट पत्रकार परिषदा घेऊन हिंगोलीचाच उमेदवार अन्यथा बंडखोरीची भाषा बोलत आहे. तर दुसरा गट मात्र माजी खासदार सुभाष वनखेडे यांच्या समर्थनात मातोश्री पर्यन्त लॉबिंग करीत असल्याची चर्चा मतदार संघात सुरू आहे. त्यातच लोकसभेसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या एका बंजारा नेत्याला एका महामंडळाचे पद देऊन चुडीचूप केलेय. एवढी परिस्थिती असूनही शिवसेनेला अद्याप सातवासारख्या मत्तबराला टक्क देण्यासाठी सक्षम उमेदवारच भेटला नाही का? याची जोरदार चर्चा होत आहे.

या विश्लेषण चे फोटो मेल केलेत
बातमीत वापरून घेणे.

हे विश्लेषण लावावे एकही अजून पर्यन्त एकही लोकसभा निवडणुकीचे विश्लेषण लावलेले नाही
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.