हिंगोली- नगर पालिकेच्या वतीने शहरात करण्यात आलेल्या कामात अपहार केल्याचा आरोप विराट राष्ट्रीय लोकमंचकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट राष्ट्रीय लोकमंचच्या वतीने पालिकेची प्रतिकात्मक शव यात्रा काढून निषेध करण्यात आला. या शव यात्रेत मोठ्या संख्येने मुस्लीम बांधव सहभागी झाले आहेत.
शहरातील नगर परिषदेचे मुख्याधिकारी, जबाबदार कौन्सिलचे पदाधिकारी आणि ठेकेदार यांनी संगनमत करून शासनाच्या कोट्यवधी नीधीचा अपहार करत दर्जाहीन काम केल्याचा आरोप विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिलच्या वतीने करण्यात आला आहे. त्यामुळे, शासन व नगर प्रशासनाची शव यात्रा काढून निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच, १०१ कोटी रुपये निधीच्या रस्त्यांचे नियम बाह्यपद्धतीने कामे सुरू आहेत. मात्र, ती कामे दर्जाहीन होत आहेत. त्यामुळे, या कामांची चौकशी करण्यासंदर्भात अनेकदा मागणी करण्यात आली. मात्र, याकडे काहीही लक्ष देण्यात आले नाही. त्यामुळे, विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिलच्या वतीने पलटण ते नगरपरिषद कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर शवयात्रा काढण्यात आली. त्याचबरोबर, बांगड्यांचा आहेर करून पालिकेचा निषेध करण्यात आला.
हेही वाचा- हिंगोली : जवळा बाजारातील कुंटनखान्यावर छापा; 6 महिलेसह एका पुरुषाविरोधात गुन्हा