ETV Bharat / state

हिंगोलीतील सारंग स्वामी यात्रा महोत्सव : 529 वर्षांची परंपरा, भाजीच्या महाप्रसादाची पर्वणी

शंभरहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या सारंग स्वामी यात्रा महोत्सवाला सुरुवात झाली आहे. या यात्रेचे मख्य आकर्षण असलेला महाप्रसाद घेण्यासाठी राज्यातून भाविक टेकडीवर येतात.

sarang-swami-yatra-was-celebrated-in-hingoli
भाजीचा महाप्रसाद म्हणजे हिंगोली जिल्ह्यातील भाविकांसाठी पर्वणीच
author img

By

Published : Jan 18, 2020, 10:16 AM IST

हिंगोली - शंभरहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या सारंग स्वामी यात्रा महोत्सवातील मुख्य आकर्षण असते ते पंधरा भाज्यांपासून बनवलेल्या महाप्रसादाचे. हा महाप्रसाद घेण्यासाठी जिल्ह्यासह राज्यातून हजारोच्या संख्येने भाविक या टेकडीवर धाव घेतात. याठिकाणी सारंगस्वामी महाराज यांनी संजीवन समाधी घेतलेली आहे. जवळपास 529 वर्षांची ही परंपरा आहे.

भाजीचा महाप्रसाद म्हणजे हिंगोली जिल्ह्यातील भाविकांसाठी पर्वणीच

सारंग स्वामी यात्रेतील भाजीच्या महाप्रसादाची वर्षभरापासून भाविक प्रतीक्षा करतात. आज तो क्षण आल्याने हा प्रसाद घेण्यासाठी भाविक आवर्जून या ठिकाणी हजेरी लावतात. हा दिवस म्हणजे हिंगोली जिल्ह्यातील भाविकांसाठी पर्वणीच असतो. वीरशैव लिंगायत समाजाच आराध्य दैवत म्हणून सारंग स्वामी महाराज यांची पुण्यतिथी म्हणून आजचा महाप्रसादाचा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या ठिकाणी भरवण्यात येणारी यात्रा सर्वदूर प्रसिद्ध आहे. याच दिवशी या यात्रेचा समारोप देखील या पंधरा प्रकारच्या मीश्चित केलेल्या भाजीने केला जातो. भाजीचा प्रसाद घेतल्यानंतर वर्षभर आरोग्य ठणठणीत राहते, अशी भविकाची श्रध्दा आहे. त्यामुळे शक्यतोर हा महाप्रसाद कोणीही टाळत नाहीत. उंच टेकडीवर असलेले सारंग स्वामीचे मंदिर सर्वदूर प्रसिध्द आहे. सारंगस्वामीचे दर्शन घेण्यासाठी टेकडीवर पायऱ्या रेंगत भाविक जातात. अनेक पायऱ्या रेंगूनही अजीबात थकवा येत नसल्याचे भाविक अनुभव सांगतात. भाजीच्या महाप्रसादाबरोबरच दोन वर्षापासून वसमतच्या माजी नगराध्यक्षा उज्वला ताभाळे या ठिकाणी भाकरीचे देखील वाटप करत आहेत. त्यामुळे या महाप्रसादामध्ये अजून रंगत आली आहे. भाजी घेण्यासाठी पहाटे पासून या ठिकाणी भाविकांच्या रांगा लागल्या आहेत.

सायंकाळी सहा वाजेपर्यंत भाजीच्या महाप्रसादाचे वाटप सुरू राहते. मंदिर परिसरात थाटलेल्या दुकानावर ही मोठी गर्दी असते. तर एस. टी. महामंडळाच्या वतीने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सहा ज्यादा बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे दिवसभर यात्रा महोत्सवात रेलचेल सुरू असते.

Intro:*
हिंगोली- शंभरहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या सारंग स्वामी यात्रा महोत्सवातील मुख्य आकर्षण असते ते पंधरा भाज्यांपासून बनविलेल्या महाप्रसादाच. हा महाप्रसाद घेण्यासाठी जिल्ह्यासह जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने या टेकडीवर धाव घेतात. याठिकाणी सरंगस्वामी महाराज यांनी जिवन संजीवनी समाधी घेतलेली आहे. जवळपास 529 वर्षांची परंपरा आहे.

Body:सारंग स्वामी यात्रेतील भाजीच्या महाप्रसादाची वर्षभरापासून भाविक प्रतीक्षा करतात. आज तो क्षण आल्याने हा प्रसाद घेण्यासाठी भाविक आवर्जून या ठिकाणी हजेरी लावतात हा दिवस म्हणजे हिंगोली जिल्ह्यातील भाविकांसाठी पर्वणीच असतो. वीरशैव लिंगायत समाजाच आराध्य दैवत म्हणून सारंग स्वामी महाराज यांची पुण्यतिथी म्हणून आजचा महाप्रसादाचा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी या ठिकाणी भरण्यात येणारी यात्रा सर्वदूर प्रसिद्ध असते त्याच दिवशी या यात्रेचा समारोप देखील या पंधरा प्रकारच्या मीश्चित केलेल्या भाजीने केला जातोय. भाजीचा प्रसाद घेतल्यानंतर वर्षभर आरोग्य ठणठणीत राहतेय असा भविकाचा मानस आहे. त्यामुळे शक्यतोर हा महाप्रसाद कोणीही टाळत नाहीत. उंच टेकडीवर असलेलं सारंग स्वामीच मंदिर सर्वदूर प्रसिध्द आहे. सरंगस्वामीचे दर्शन घेण्यासाठी टेकडीवर पायऱ्या रेंगत भाविक जातात. अनेक पायऱ्या रेंगूनही अजीबात थकवा येत नसल्याचे भाविक अनुभव सांगतात. तर भाजीच्या महाप्रसादा बरोबरच दोन वर्षापासून वसमत च्या माजी नगराध्यक्षा उज्वला ताभाळे या ठिकाणी भाकरीचे देखील वाटप करत आहेत. त्यामुळे या महाप्रसादा मध्ये अजून रंगत आलीय. भाजी घेण्यासाठी पहाटे पासून या ठिकाणी भाविकांच्या रांगा लागल्या आहेत. Conclusion:सायंकाळी सहा वाजेपर्यंत भाजीच्या महाप्रसादाचे वाटप सुरू राहते. तर मंदिर परिसरात थाटलेल्या दुकानावर ही मोठी गर्दी असते. तर एस. टी महामंडळाच्या वतीने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सहा ज्यादा बसेस उपलब्द करून दिल्या आहेत. त्यामुळे दिवसभर यात्रा महोत्सवात रेलचेल सुरू होती.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.