हिंगोली - आतापर्यंत येथे कोरोनाचे 7 रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यात कोरोनाबाधित जवानांच्या संपर्कात आलेल्या जवानांना तिरुमला मंगल कार्यालयात होम क्वॉरंटाईन केले आहे. नगर पालिकेच्या वतीने आज (रविवारी) मंगल कार्यालय आणि परिसराचे अतिशय काळजीपूर्वक निर्जंतुकीकरण करण्यात आले.
हिंगोली जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत शहरात विविध भागात नगर पालिकेकडून गल्लीबोळ निर्जंतुकीकरण केले जात आहे. त्याच बरोबर ज्या ठिकाणी राज्य राखीव दलाच्या जवानांना क्वारंटाईन केले आहे, त्या तिरुमाला मंगल कार्यालयाचे अतिशय बारकाईने निर्जंतुकीकरण करण्यात आले.
हेही वाचा - 'केशरी रेशन कार्डधारकांना राज्य सरकारकडून तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ'
सोबतच आरोग्य विभागाच्या वतीने जवान आणि त्यांच्या 409 कुटुंबातील 1446 सदस्यांची तपासणी करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून, नगरपालिकेच्या वतीने शहरातील सर्वच खुश्कीचे मार्ग बंद केले आहेत. मात्र, यानंतरही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही बसविण्यात आलेले आहेत. तर यामध्ये बॅरिकेटचे नुकसान करणाऱ्यांविरुद्धही गुन्हा दाखल केला जाणार आहे.