ETV Bharat / state

खेड्या पाड्याचे रस्ते केले बंद; मालसेलूत दक्षता समितीने घेतला पुढाकार

मालसेलू येथील दक्षता समिती आता जागृत झाली असून, बाहेरून येणाऱ्याला जसे गावात येण्यासाठी थांबवले तसेच गावात बाहेरून आलेल्याची प्रकृतीची विचारणा केली जात आहे. दक्षता समितीचे अध्यक्ष तथा सरपंच धम्मदीपक खंदारे आणि ग्रामसेवक वर्षा गायकवाड यांनी प्रत्येकाला गावातील भाग वाटून दिला आहे

road blocked by people
खेड्या पाड्याचे रस्ते केले बंद; मालसेलूत दक्षता समितीने घेतला पुढाकार
author img

By

Published : Apr 4, 2020, 9:27 PM IST

हिंगोली - कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या आहेतच मात्र त्यासोबतच आता शहरातील नगरे आणि गल्लीबोळातील रस्ते बंद करण्यात आले आहेत. तसेच आता ग्रामीण भागातही बाहेर गावावरून येणाऱ्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. हिंगोली तालुक्यातील मालसेलू येथे पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पाटील सिधोधन भिसे यांनी स्थापन केलेल्या दक्षता समितीने पुढाकार घेऊन येथील प्रमुख रस्ते बंद केले असून, येथे 24 तास उभे राहण्याची जबाबदारी वाटून घेतली आहे.

संपूर्ण राज्यात थैमान घातलेल्या कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील एकाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यामूळे त्याच्या संपर्कात आलेल्यांचा आरोग्य विभाग शोध घेत आहे. जिल्हा प्रशासन आरोग्य विभाग गतीने कामाला लागले आहे. विशेष म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन पाळला जात आहे. अशाच परिस्थितीत ग्रामीण भागात परजिल्ह्यात कामा निमित्ताने गेलेले अनेक कुटुंब परत आपल्या माय भूमीत आले आहेत. बाहेर गावावरून येणाऱ्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होईल या भीतीपोटी आता ग्रामीण भागात पूर्णपणे रस्ते बंद केले जात आहेत. जिल्ह्यातील अनेक गावांत ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन, रस्त्यावर मोठमोठी झाडे तोडून टाकली आहेत. त्यामुळे शहरी ठिकाणावरून ग्रामीण भागात जाणाऱ्यांची मात्र चांगलीच पंचायत निर्माण झाली आहे.

मालसेलू येथील दक्षता समिती आता जागृत झाली असून, बाहेरून येणाऱ्याला जसे गावात येण्यासाठी थांबवले तसेच गावात बाहेरून आलेल्याची प्रकृतीची विचारणा केली जात आहे. दक्षता समितीचे अध्यक्ष तथा सरपंच धम्मदीपक खंदारे आणि ग्रामसेवक वर्षा गायकवाड यांनी प्रत्येकाला गावातील भाग वाटून दिला आहे. आपआपल्या भागातील माहिती घेऊन ग्रामपंचायतला कळविली जाणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.