ETV Bharat / state

रिसाला बाजार परिसर कंटेनमेंट झोनमध्ये; जाणून घ्या, कोणकोणत्या नगरात आहे प्रवेशबंदी

author img

By

Published : May 6, 2020, 8:23 AM IST

Updated : May 6, 2020, 10:23 AM IST

जिल्हा सामान्य रुग्णालयात राबणाऱ्या एका 24 वर्षीय परिचरिकेला कोरोनाची लागण झालेली आहे. त्यामुळे परिचारिका राहत असलेल्या रिसाला बाजार भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याअनुषंगाने रुग्ण आढळलेल्या रिसाला बाजार परिसराला प्रतिबंधित कंटेनमेंट झोन घोषित केले असून ३ किमीपर्यंतचा परिसर सील करण्यात आला आहे.

रिसाला बाजार परिसरातील 03 कि.मी. पर्यंतचे क्षेत्र प्रतिबंधीत

हिंगोली - दिवसेंदिवस शहरात कोरोनाबाधित रुग्ण वाढत असल्याने, भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. रिसाला बाजार भागात वास्तव्यास आलेल्या परिचरिकेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी रिसाला बाजार परिसरातील ३ किमी पर्यंतचे क्षेत्र प्रतिबंधित केले आहे. शिवाय या भागात लहान सहान हालचालींवर प्रशासन लक्ष ठेऊन आहे.

रिसाला बाजार परिसर कंटेनमेंट झोनमध्ये

हिंगोली येथे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 92 वर पोहोचली आहे. यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयात राबणाऱ्या एका 24 वर्षीय परिचरिकेला कोरोनाची लागण झालेली आहे. त्यामुळे परिचारिका राहत असलेल्या रिसाला बाजार भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याअनुषंगाने परिबंधननीती योजनेतील (कंटेनमेंट प्लॅन)सुचनेनुसार रुग्ण आढळलेल्या रिसाला बाजार परिसराला प्रतिबंधित कंटेनमेंट झोन घोषित केले असून ३ किमीपर्यंतचा परिसर सील करण्यात आला आहे.

प्रतिबंधित क्षेत्रामध्ये अकोला बायपास रोड उत्तर भाग 3 किमी, एनएच 161 बायपास पूर्वेस भाग अंतर 3 किमी, कयाधू नदी दक्षिण भाग अंतर 3 किमी आणि नांदेड बायपास पश्चिम भाग अंतर 3 किमीपर्यंत आहे. यामध्ये हिंगोली शहरातील आदर्श कॉलेज, रिसाला बाजारचा भाग गारमाळ, रिसाला, शिवाजीनगर, महसुल कॉलनी, बियाणी नगर, नारायण नगर, सरस्वती नगर, खुशाल नगर, साई नगर, इंदिरा नगर, कमला नगर, हमालवाडी, सिध्दार्थनगरचा भाग बागवानपूरा, तोफखाना आरामशीन लाईन तलाबकट्टा, नवामोंढा, गाडीपूरा, मारवाडी गल्ली, कोमटी गल्ली, गवळीपूरा भाग, महादेव वाडी, भोईपूरा, टालेहॉल, बंजारवाडा, निरंजनबाबा चौककडील भाग, पोळा मारोतीकडील भाग, भोईपुरा सदरबाजार खडकपूरा, पेन्शनपूरा, गवळीपूरा, आदर्श नगर, मस्तानशहा नगर, पलटन, पारधीवाडा, वडरवाडा, बस स्थानकमागील भाग, देवडा नगर, एसआरपी कॅम्प, पोलीस वसाहत, आझम कॉलनीचा भाग, बावनखोली, नगर परिषद वसाहत, शिवराज नगर, एनटीसी नाईक नगर इत्यादी भाग हे या प्रतिबंधित कंटेनमेंट झोन क्षेत्रामध्ये समाविष्ठ करण्यात आले आहे. तसेच सदर परिसराची संपुर्ण सीमाबंद करण्यात येत असुन, येथून कोणतेही वाहन अथवा व्यक्ती यांना आत किंवा बाहेर जाण्यास पुढील आदेशापर्यत परवानगी नाही.

संचारबंदी कालावधीमध्ये परवानगी घेतलेल्या व्यक्तीशिवाय इतर कोणतीही व्यक्ती रस्त्याने, बाजारमध्ये, गल्लीमध्ये, घराबाहेर फिरताना आढळल्यास त्या व्यक्तीवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या कलम 51 तसेच भारतीय दंड सहिता 1860 च्या कलम 188 नुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल. आदेशाची अंमलबजावणी करण्याची जवाबदारी ही जिप मुख्यकार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक हिंगोली, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक हिंगोली, सर्व उपविभागीय अधिकारी, हिंगोली, सहआयुक्त अन्न व औषध प्रशासन परभणी, सर्व तहसीलदार, सर्व मुख्याधिकारी, नगरपरिषद, नगर पंचायत, ग्रामसेवक तलाठी इत्यादींची असेल, असे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

Last Updated : May 6, 2020, 10:23 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.