हिंगोली - येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना वार्डमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णाचा 14 दिवसानंतर पहिला अहवाल हा निगेटिव्ह आला आहे. दुसराही अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्या रुग्णाला सुट्टी देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली आहे. त्यामुळे सध्यातरी हिंगोली जिल्हा कोरोना मुक्त होण्याच्या मार्गावर आहे.
संपूर्ण जगभरात खळबळ माजवलेल्या कोरोनाने सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना वार्डमध्ये मागील 14 दिवसांपासून उपचार घेत असलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णाचा अहवाल हा औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालयातून बुधवारी निगेटिव्ह प्राप्त झाला आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनाने आणि नागरिकांनी सुटकेचा नि: श्वास सोडला आहे.
हेही वाचा - या काळातही लहान मुलांच्या प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी प्रयत्न करा - जागतिक आरोग्य संघटना
आतापर्यंत 43 कोरोना संशयित दाखल केले होते. त्या सर्वांचे निगेटिव्ह अहवाल आले आहेत. तर वसमत येथे 12 शासकीय क्वारंटाईन केले आहेत. तर 2 कोरोना संशयित वसमत येथील रुग्णालयात दाखल केले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रस्त्यावर न फिरण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने केले जात आहे.