हिंगोली - एका सर्व सामान्य व्यक्तीचे काम मार्गी लावण्यासाठी शिक्षण सभापती रत्नमाला चव्हाण या वसमत येथील गटविकास अधिकारी विठ्ठल सुरूसे यांच्या ऑफिसमध्ये आल्या. तेव्हा ऑफिसमध्ये त्यांना गटविकास अधिकारी सुरूसे दिसले नाहीत. त्यांनी सुरूसे यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. सुरूसे आले आणि पाच मिनिटांत, मी परत येतो, असे सांगून तिथून निघून गेले. त्यानंतर ते आलेच नाहीत. तेव्हा चव्हाण यांनी पती आणि कार्यकर्त्यांसोबत ऑफिसमध्येच मुक्काम ठोकला.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती रत्नमाला चव्हाण यांनी गटसाधना केंद्राला भेट दिल्यानंतर एका सर्वसामान्य व्यक्तीचे काम मार्गी लावण्यासाठी वसमतचे गटविकास अधिकारी विठ्ठल सुरूसे यांचे ऑफिस गाठले. तेव्हा सुरूसे ऑफिसमध्ये हजर नव्हते. चव्हाण यांनी सुरूसे यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. सुरूसे काही वेळात ऑफिसमध्ये हजर झाले आणि पाच मिनिटांत परत येतो, असे चव्हाण यांना सांगून तिथून निघून गेले. इकडे तास झाला तरी सुरूसे आले नाहीत. तेव्हा चव्हाण यांनी सुरूसे यांना फोनवरुन संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरूसे यांचा फोन बंद येत होता. तेव्हा चव्हाण यांनी जो पर्यंत गटविकास अधिकारी येणार नाहीत, तोपर्यंत कार्यालय न सोडण्याचा निर्णय घेतला.
तास झाला दोन तास झाले एवढंच काय रात्रीचे अकरा वाजले तरी, सुरूसे काही परत आले नाहीत. रात्र झाली तरी चव्हाण यांनी आपला निर्णय मागे घेतला नाही. त्यांनी पती आणि कार्यकर्त्यांसोबत ऑफिसमध्येच जेवण केलं आणि ऑफिसमध्येच मुक्काम ठोकला. दरम्यान, नेमकं चव्हाण या ऑफिसमध्ये आल्या अन् गटविकास अधिकाऱ्याने का काढता पाय घेतला? याचे कारण अजून तरी गुलदस्त्यात आहे.
हेही वाचा - ...म्हणून जिल्हा परिषदेने सर्वच गावांना सज्ज राहण्याच्या दिल्या सूचना
हेही वाचा - विभागीय आयुक्त केंद्रेकरांच्या दौऱ्याने शासकीय यंत्रणेची धांदल, सर्वकाही 'इशारो इशारो में'