ETV Bharat / state

ढाब्याचे नियोजन करा ! कार्यकर्त्याच्या सल्ल्याने सातवांसह वानखेडेंची गोची - हिंगोली

निवडणुकीच्या नियोजनासाठी राजीव सातव मार्गदर्शन करणार होते. त्याआधी कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करावे असे ठरले. तेव्हा संतोष गोरे नामक कार्यकर्ता उठला. त्याने मागच्या निवडणुकीत राजीव सातव यांनी कशा प्रकारे नियोजन केले होते ते सांगायला सुरुवात केली. यावेळी त्याने वानखेडेंनाच खडे बोल सुनावले.

काँग्रेसच्या बैठकीत मनोगत व्यक्त करताना कार्यकर्ता
author img

By

Published : Apr 1, 2019, 1:42 PM IST

हिंगोली - काँग्रेस उमेदवार सुभाष वानखेडे यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी हिंगोलीत बैठक घेण्यात आली. काँग्रेस नेते राजीव सातव आणि उमेदवार सुभाष वानखेडे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पाडली. या बैठकीत कार्यकर्त्यांना मनोगत व्यक्त करण्यास सांगितले. यावेळी एका कार्यकर्त्याने निवडणूक काळात नियोजन करण्यासंबंधी थेट वानखेडेंनाच सल्ला दिला. निवडणूक काळात 'ढाब्या'वर कशाप्रकारे 'नियोजन' करायचे हे त्याने सांगितले. त्याच्या या सल्ल्यामुळे सातव आणि वानखेडेंची मात्र चांगलीच गोची झालेली पहायला मिळाली.

कार्यकर्त्याचा अजब सल्ला जिल्ह्यात चर्चेचा विषय झाला आहे

निवडणुकीच्या नियोजनासाठी राजीव सातव मार्गदर्शन करणार होते. त्याआधी कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करावे असे ठरले. तेव्हा संतोष गोरे नामक कार्यकर्ता उठला. त्याने मागच्या निवडणुकीत राजीव सातव यांनी कशा प्रकारे नियोजन केले होते ते सांगायला सुरुवात केली. यावेळी त्याने वानखेडेंनाच खडे बोल सुनावले. तसेच, मागच्या वेळी कार्यकर्त्यांसाठी दारुच्या बॉक्सची व्यवस्था कशी करण्यात आली होती, हे त्याने सांगितले आणि उपस्थित नेत्यांची गोची झाली.

कार्यकर्ता एवढ्यावरच थांबला नाही, तर कार्यकर्त्यांसाठी ढाब्यावर नियोजन लावण्यासंबंधी सांगू लागला. कार्यकर्त्याचा उत्साह फारच वाढल्याचे दिसताच सातव अस्वस्थ झाले. लोकांमध्ये चुकीचा संदेश जात आहे हे पाहून सातव यांनी त्याला थांबण्याची सूचना केली. पण, तोपर्यंत कार्यकर्ता सगळे बोलून गेला होता. या भाषणाची जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगत आहे.

Intro:कोणतीही निवडणूक म्हटलं की कार्यकर्त्यांसाठी एखादं सण च असतो. या सणात मोठ्या पोट तिडकीने कार्यकर्ते एका दिलाने काम ही करत असतात. ही कार्यकर्त्यांची दिलजमाई का होते. याचे खरेखुरे कथन काँग्रेस कडून निवडणूक रिंगणात असलेले सुभाष वानखेडे यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी राजीव सातव यांच्या उपस्थितीत घेतलेल्या बैठकीत एका संतोषराजे गोरे नावाच्या होसी कार्यकर्त्यांने कथन केले. एवढेच नव्हे तर मागील वेळेस सातव यांनी कशा प्रकारे नियोजन लावले होते, या आठवणीला ही उजाळा दिला. कार्यकर्त्यांच्या दिलखुलास मुळे आपली गोची झाल्याचे लक्षात येताच राजीव सातव यांनी त्यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला.

Body:हिंगोली लोकसभा मतदार संघात निवडणुकीने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आप- आपल्या उमेदवाराच्या प्रचारात तल्लीन आहे. मात्र जीवाची जराही पर्वा न करता निवडणुकीत संधी मिळेल त्या उमेदवारांची प्रचाराची तोफ सांभाळणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या आता वाढत आहे. हे कार्यकर्ते एवढ्या पोट तिडकीने काम करतात, याची जराही आपण कल्पनाही करू शकत नाही. हाक द्याल त्या ठिकाणी काही क्षनात कार्यकर्ते हजर, कोणती सभा, बैठक, कार्यकर्ता मेळावा असे वेगवेगळे घेतलेल्या कार्यक्रमात हे कार्यकर्ते आवर्जून हजेरी लावतात. काही काही कार्यकर्त्यांना तर सभेची देखील जबाबदारी दिली जाते. ती जबाबदारी कार्यकर्ते पेलतातही. त्याचे खरेखुरे कारण आज सुभाष वानखेडे यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या बैठकितुन समोर आले. या ठिकाणी पदाधिकारी व उमेदवार बोलण्या अगोदर कार्यकर्त्यांचे मनोगत घेण्यात आले होते. दरम्यान, संतोष गोरे नावाचा कार्यकर्ता उठला अन मनोगत व्यक्त करताना, थेट उमेदवारालाच सल्ले मसलत देत मागील उमेदवारांने आमचे कसे नियोज लावले होते, याचे देखील भावनेच्या भरात आघाडीचे उमेदवार वानखेडे यांना खडे बोल सुनावले. एवढेच नव्हेवतर मागील निवडणुकीत राजूभाऊनी कार्यकर्त्यांचे नियोजन केल्याचेही सांगून गेला. तसेच तुम्ही ही कराल असे सांगून दारूच्या बॉक्सची व्यवस्थित वाहतूक करून कार्यकर्त्या पर्यन्त पोहोचती केली. हे देखील सांगण्यास कमी केली नाही.

Conclusion: एवढेच नव्हे तर हा कार्यकर्ता गाडी घोडी आणि ढाब्यवर नियोजनाची भाषा बोलून गेला. त्यामुळे निवडणूक काळात अशीही व्यवस्था असल्याचा अनुभव या ठिकाणी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना आला. कार्यकर्त्यांचा उस्ताह वाढत असल्याचे पाहून सातव यांनी कार्यकर्त्याचे बोलणे थांबविले. आशा आगळ्या वेगवेगळ्या सुचनाने सातव व वानखेडे हे चक्रावले तर सभेतील उपस्थितांचे कान टवकारले होते. कार्यकर्त्यांच्या मनोगताची चर्चा मात्र जिल्हाभरात मोठ्या चवीने सुरू होती.

व्हिज्युअल ftp केले आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.