ETV Bharat / state

हाय प्रोफाईल जुगार अड्ड्यावर छापा, 17 जण ताब्यात - हिंगोली क्राईम न्यूज

जिल्ह्यातल्या हट्टा पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या दोन हाय प्रोफाईल जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापेमारी केली. या छाप्यात पोलिसांनी 1 लाख 42 हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून, 17 जणांना ताब्यात घेतले आहे.

raid on gambling den
पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा
author img

By

Published : Nov 22, 2020, 3:22 PM IST

हिंगोली - जिल्ह्यातल्या हट्टा पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या दोन हाय प्रोफाईल जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापेमारी केली. या छाप्यात पोलिसांनी 1 लाख 42 हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून, 17 जणांना ताब्यात घेतले आहे. हा जुगार अड्डा अनेक दिवसांपासून सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला.

पहिल्या घटनेत आडगाव शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारण्यात आला. घटनास्थळावरून 23 हजारांचे मोबाईल, एक दुचाकी आणि जुगार साहित्य असा एकूण 69 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर दामोदर विर, पंजाब चव्हाण, ज्ञानोबा रामराव चव्हाण, बालासाहेब तुकाराम चव्हाण, अकबर शेख मुसा, सुनील त्र्यंबकराव चव्हाण, निवृत्ती केशवराव पंडित, दत्तराव गंगाराम चव्हाण आणि दत्ता ज्ञानोबा चव्हाण सर्व राहणार तुळजापूर वाडी तालुका वसमत यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

दुसऱ्या घटनेमध्ये पोलिसांनी हट्टा शिवारातील गंगाधर खाडे यांच्या शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारला. या छाप्यात पोलिसांनी घटनास्थळावरून गंगाधर अर्जुन खाडे, बाळू रामराव देशमुख, शेख कदीर शेख जानी, सय्यद इब्राहिम सय्यद जफार, राष्ट्रपाल शंकर खाडे आणि सुनील खाडे सर्व राहणार हट्टा यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 72 हजार 660 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपींची समज पत्रावर सुटका

दरम्यान या सर्व आरोपींवर हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर या सर्व आरोपींची समज पत्रावर सुटका करण्यात आली. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा - हुतात्म्यांचा स्पर्श झालेल्या मातीने साकारणार नकाशा, औरंगाबादेतील देशभक्ताचे अनोखे अभियान

हेही वाचा - कोरोना अन् शाळा... कधी वाजणार घंटा? 'ईटीव्ही भारत'चा आढावा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.