ETV Bharat / state

Bharat Jodo Yatra : मोदी सरकारच्या काळात पीकविमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लूट - राहुल गांधी

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे भारत जोडो पदयात्रेचा आजचा दिवस संपला. यावेळी चौकसभेत जनसमुदाला संबोधित करताना राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी मोदी सरकारवर चौफेर हल्ला चढवला. कळमनुरी भागात काही शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी शेतातील सर्व पीक वाया गेल्याचे दाखवले, सोयाबीन पुर्णपणे जळून गेले होते पण पीकविमा कंपन्याकडून नुकसान भरपाई मिळत नाही. यावेळी विमा कंपन्या शेतकऱ्यांची खुलेआमपणे लूट करत असल्याचा आरोप खासदार राहुल गांधी यांनी केला. in Bharat Jodo Yatra in hingoli district

Bharat Jodo Yatra
खासदार राहुल गांधी
author img

By

Published : Nov 12, 2022, 8:47 PM IST

हिंगोली : मोदी सरकार सत्तेत आल्यापासून मागील आठ वर्षात शेतकरी, कष्टकरी, कामगार वर्गाचे अपरिमित नुकसान झाले आहे. मनरेगाचा रोजगार मिळत नाही, कामगारांच्या हाताला काम नाही, पैसाही नाही. शेतात राबणाऱ्या शेतकरीला देशोधडीला लावला आहे. पीकविम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून पैसे घेतले जातात. पण नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना दमडीही मिळत नाही. विमा कंपन्या शेतकऱ्यांची खुलेआमपणे लूट करत असल्याचा आरोप खासदार राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी भारत जोडो यात्रेच्या (Bharat Jodo Yatra ) हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीच्या चौक सभेत केला.

भारत जोडो यात्रा हिंगोलीत - हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे आज पदयात्रेचा आजचा दिवस संपला. यावेळी चौकसभेत जनसमुदाला संबोधित करताना राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी मोदी सरकारवर चौफेर हल्ला चढवला. कळमनुरी भागात काही शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी शेतातील सर्व पीक वाया गेल्याचे दाखवले, सोयाबीन पुर्णपणे जळून गेले होते पण पीकविमा कंपन्याकडून नुकसान भरपाई मिळत नाही. कोणाकडे दाद मागावी हेही समजत नाही अशी अवस्था असल्याचे शेतकऱ्याने सांगितले.

Bharat Jodo Yatra
भारत जोडो यात्रा हिंगोली जिल्ह्यात

दिवंगत राजीव सातव यांच्या आठवणींना उजाळा - राहुल गांधी यांनी यावेळी दिवंगत माजी खासदार राजीव सातव यांच्या आठवणींना उजाळा दिला. राजीव माझे मित्र होते, काम चांगले करायचे, त्यांनी नेहमीच तुमच्यासाठी काम केले, असे राहुल गांधी म्हणाले. देशात द्वेष पसरवला जात आहे, भांडणे लावली जात आहेत पण या देशात द्वेष पसरवणाऱ्यांना स्थान नाही. भारत जोडो यात्रा कन्याकुमारीहून निघाली असून श्रीनगरमध्ये जाऊन तिरंगा फडकवूनच थांबणार आहे. देशातील सर्वसामान्यांचे प्रश्न हाती घेऊन आम्ही ही पदयात्रा काढली असून तुमचे प्रेम व शक्तीच आम्हाला चालण्याची प्रेरणा देते, असेही राहुलजी गांधी म्हणाले.

Bharat Jodo Yatra
व्यासपीठावर कॉंग्रेस नेते उपस्थित

शेतकऱ्याला संपविण्याचे काम - मोदी सरकारच्या काळात शेतकरी व शेती संपवण्याचे काम केले जात आहे. शेतकऱ्यांकडून विमाचे हप्त्यापोटी पैसे घेतले जातात. पण नुकसान भरपाई मात्र मिळत नाही, मिळाली तर अत्यंत तुटपुंजी मिळते. मोदी सरकारमध्ये पीकविमा कंपन्या मालामाल झाल्या आहेत आणि शेतकरी मात्र कंगाल झाला आहे. व्यासपीठावर विधिमंडळ पक्षनेते व पदयात्रेचे समन्वयक बाळासाहेब थोरात, माजी मंत्री वर्षा गायकवाड, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, खा. रजनी सातव, प्रदेश कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी संपतकुमार, आमदार डॉ. प्रज्ञा सातव आदी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.