ETV Bharat / state

हिंगोली: प्रवाशाला खुर्चीवर बस म्हणणे वाहकास भोवले - passenger smashes bus conductor in hingoli

हिंगोलीत एक प्रवासी बसमध्ये चालकाच्या बाजुला असलेल्या बोनट वर बसला होता. त्यामुळे वाहकाने त्या प्रवाशाला मागे खुर्च्या रिकाम्या आहेत म्हणून मागे जाऊन बसण्यास सांगितले. प्रवासी उठून मागे बसण्यासाठी गेला मात्र, वाहक तिकीट काढण्यासाठी त्या प्रवाशाजवळ गेले असता त्या प्रवाशाने अचानक वाहकाला धक्काबुक्की करत बस काय तुझ्या बापाची आहे का? अशी अरेरावी करून थेट मारहाण करण्यास सुरुवात केली.

बस वाहक
author img

By

Published : Sep 7, 2019, 9:51 PM IST

हिंगोली- वसमत येथे नेहमीच मारहाणीच्या घटना घडत असतात. त्यामुळे या ठिकाणी नोकरवर्ग जीव मुठीत घेऊनच वास्तव्य करतो. यातच एका बसच्या वाहकास प्रवाशाला जागेवर जाऊन बस म्हणणे देखील भोवले आहे. बसमधील प्रवाशाने थेट वाहकाशी धक्काबुक्की करत मारहाण केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे बसचालक अन वाहकाने पोलीस ठाणे गाठत त्या प्रवाशाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करताना बस वाहक

नागोराव किसन डुकरे (वाहक क्रमांक 4611) असे वाहकाचे नाव असून, ते ओंढा ते वसमत मार्गे जाणाऱ्या एम.एच. 14 बी.टी. 1960 या क्रमांकाच्या बसवर वाहक म्हणून कर्तव्यावर होते. दरम्यान, एक प्रवासी बसमध्ये चालकाच्या बाजूला असलेल्या बोनट वर बसला होता. त्यामुळे वाहक डुकरे यांनी त्या प्रवाशाला मागे खुर्च्या रिकाम्या आहेत म्हणून मागे जाऊन बसण्यास सांगितले. प्रवासी उठून मागे बसण्यासाठी गेला. मात्र वाहक तिकीट काढण्यासाठी त्या प्रवाशाजवळ गेले असता त्या प्रवाशाने अचानक वाहकाला धक्काबुक्की करत बस काय तुझ्या बापाची आहे का? अशी अरेरावी करून थेट मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण केल्याने एकच गोंधळ उडाला. त्या प्रवाशाला अनेक जण समजून सांगण्याचा प्रयत्न करत होते. मात्र तो प्रवासी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यामुळे चालक आणि वाहकाने थेट पोलीस ठाणे गाठून त्या प्रवाशाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

Intro:वसमत येथे नेहमीच मारहाणीच्या घटना घडतात. त्यामुळे या ठिकाणी नोकरवर्ग हा जीव मुठीत घेऊनच वास्तव्य करतोय. आज मात्र बस च्या वाहकास प्रवाशाला सीट वर जाऊन बस म्हणणे देखील भोवले आहे. त्या प्रवाशाने थेट वाचकाची गचंडी धरत मारहाण केल्याची घटना घडलीय. त्यामुळे बस चालक अन वाहकाने पोलीस ठाणे गाठत त्या प्रवाशाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकाराने मात्र बस चालक अन वाहकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Body:नागोराव किसन डुकरे (वाहक क्रमांक 4611) असे वाहकाचे नाव असून, ते ओंढा ते वसमत मार्गे जाणाऱ्या एम. एच. 14 बी.टी. 1960 या क्रमांकाच्या बस वर वाहक म्हणून कर्तव्यावर होते. दरम्यान, एक प्रवाशी बस मध्ये चालकाच्या बाजूला असलेल्या बोनट वर बसला होता. त्यामुळे वाहक डुकरे यांनी त्या प्रवाशाला माघे सीट रिकाम्या आहेत, माघे जाऊन बसण्यास सांगितले. प्रवाशी उठून तर मागे बसण्यासाठी गेला. जेव्हा वाहक तिकीट काढण्यासाठी माघे त्या प्रवाशाजवळ गेले तर त्या प्रवाशाने अचानक वाहकाची गचंडी पकडून बस काय तुझ्या बापाची आहे का ? असे म्हणत थेट मारहाण करण्यास सुरुवात केलीय. या प्रकाराने वाहक गोंधळून गेला अन हा प्रकार चालकाच्या लक्षात आला. त्यामुळे चालकाने बस थांबवली अन प्रकार जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मारहाण केल्याने एकच गोंधळ उडाला. त्या प्रवाशाला अनेक जण समजून सांगण्याचा प्रयत्न करत होते. मात्र तो प्रवाशी काही ही ऐकण्याच्या मनस्तीत नव्हता. त्यामुळे चालक अन वाचकाने थेट पोलीस ठाणे गाठून त्या प्रवाशाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

Conclusion:नेहमीच वसमत येथे हाणामारीच्या घटना घडतात. त्यामुळे बराच अधिकारी कर्मचारी वर्ग या ठिकाणी घाबरलेल्या परिस्थितीत असतो. आज घडलेल्या घटनेने तर बस चालक अन वाहका मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बाईट- वाहक - डुकरे
शहर पोलीस ठाणे
व्हिज्युअल

ftp केले आहेत.

प्लिज चेक

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.