ETV Bharat / state

हिंगोलीतील पुसेगावात मनोरुग्णाने केली मावशी आणि आजीची हत्या

रोहिदास हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने मावशीचेदेखील त्याच्यासोबत अधून-मधून भांडण होत होते. शेवटी रागाच्या भरात आरोपी रोहिदासने वाद करत मावशीवर कुऱ्हाडीने वार केले. तर हा वाद सोडविण्यासाठी आलेल्या आजीवरही रोहिदासने वार केला.

नरसी पोलीस
नरसी पोलीस
author img

By

Published : Mar 20, 2021, 5:19 PM IST

हिंगोली - सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथे एका मनोरुग्णाने आजी व मावशीवर कुऱ्हाडीने वार करत खून केल्या घटना पुढे आली आहे. ही घटना शनिवार (आज) पहाटे चारच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी नरसी पथक दाखल झाले आहे. शिवाय घटनेचा पंचनामा सुरू असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

रोहिदास चराटे असे आरोपीचे नाव आहे. तर मंगलाबाई उत्तम बशीरे (४०, रा. परभणी) आणि देवकाबई किशन पहारे (७०) अशी मृतकांची नावे आहेत. चराटे यांच्या घरी नेहमीच वाद होत होते, त्यामुळे मंगलाबाई आपल्या बहिणीकडे काही दिवस राहण्यासाठी आल्या होत्या. तर रोहिदास हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने मावशीचेदेखील त्याच्यासोबत अधून-मधून भांडण होत होते. शेवटी रागाच्या भरात आरोपी रोहिदासने वाद करत मावशीवर कुऱ्हाडीने वार केले. तर हा वाद सोडविण्यासाठी आलेल्या आजीवरही रोहिदासने वार केला. यामध्ये मावशीचा जागीच मृत्यू झाला तर जखमी आजीला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान आजीचाही मृत्यू झाला आहे.

पंधरा दिवसापूर्वी गावातील युवका सोबत केली होती मारहाण

रोहिदासने पंधरा दिवसापूर्वी आकाश धाबे या युवकाला मारणह केली होती. तसेच गावात भाडे देऊन राहत असलेल्या एका महिलेला घरात घुसून मारहाण केली होती. या प्रकरणी संबंधित व्यक्तींनी तक्रार केली होती. मात्र पोलिसांनी यात फारसे काही लक्ष न दिल्यामुळे ही घटना घडल्याचे बोलल्या जात आहे.

..तर अनर्थ टळला असता
आरोपी रोहिदास हा नेहमीच कोणासोबतही वाद घालत होता. त्याला साधे जरी बोलले तरी तो थेट शिवीगाळ करण्यास सुरुवात करत होता. त्याच्या या प्रकाराने ग्रामस्थ भयभीत झाले होते. अनेकदा त्याच्या घरी तक्रारी दाखल केल्या होत्या. मात्र त्याच्यावर काहीही परिणाम होत नव्हता. एवढेच नव्हे तर रोहिदासच्या विरोधात नर्सी पोलीस ठाण्यात तक्रारदेखील करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी यात गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे पोलिसांनी आधीच दखल घेतली असती तर अनर्थ टळला असता, अशी चर्चा सध्या सुरू आहे.

हेही वाचा-धक्कादायक ! महिलेची घरात घुसून हत्या; कल्याण डोंबिवलीत दीड महिन्यात 6 महिलांच्या हत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.