ETV Bharat / state

परिस्थितीसमोर हतबल शेतकऱ्याने स्वतःलाच जुंपले औताला

व्यवसायाने कुंभार असलेल्या एका अल्पभूधारक शेतकऱ्याने परिस्थितीसमोर हतबल होऊन स्वतःचे आख्खे कुटुंबच औताला जुंपलेय. हे विदारक चित्र आहे वसमत तालुक्यातील हट्टा येथील एका शेतकरी कुटुंबाचे.

हिंगोली
author img

By

Published : Jul 9, 2019, 8:31 AM IST

Updated : Jul 9, 2019, 12:49 PM IST

हिंगोली - शेतकरी दिवसेंदिवस परिस्थितीसमोर हतबल होत चालला आहे. त्यातच पाऊस नाही अन् वाढत्या महागाईनं शेतकऱ्यांचं कंबरडंच मोडलंय, अशा परिस्थितीत शेती करणं म्हणजे शेतकऱ्यांसमोर एक आव्हानच आहे. सर्वसामान्य शेतकरी तर यामध्ये चांगलाच भरडून निघत आहे. व्यवसायाने कुंभार असलेल्या अशाच एका अल्पभूधारक शेतकऱ्याने परिस्थितीसमोर हतबल होऊन स्वतःचे अख्खे कुटुंबच औताला जुंपलेय. हे विदारक चित्र आहे वसमत तालुक्यातील हट्टा येथील एका शेतकरी कुटुंबाचे.

हट्टा (ता. वसमत)

पांडुरंग परंडे (रा. हट्टा) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांचा पारंपरिक व्यवसाय कुंभार काम करणे हा आहे. मात्र, वर्षभर चालणारा कुंभार व्यवसाय आता हंगामावर येऊन ठेपलाय. त्यातही हाती काहीच उरत नसल्याने हा व्यवसाय आता बंद पडण्याच्या मार्गावर आहे. परंडे यांना एक मुलगा, पाच मुली, पत्नी असा परिवार आहे. पूर्वी मातीपासून मडके बनवून ते गाढवाद्वारे गावोगाव भटकंती करून त्याची विक्री करत. मिळालेल्या उत्पन्नातून त्यांचा उदरनिर्वाह चालयचा. मात्र, दिवसेंदिवस मटक्याची मागणी घटत गेली. अन परंडे याची परिस्थिती हलाखीची बनत गेली, सणावारापुरताच हा कुंभार व्यवसाय होऊन बसला आहे. त्यामुळे परंडे यांनी एक-एक करत सर्व गाढव विकून टाकलीय. त्यामुळे या कुटुंबावर आज उपासमार येऊन ठेपलीय.

अशात त्यांच्याकडे असलेली दिड एकर शेती करण्याचा प्रश्न निर्माण झाला. पेरणी तोंडावर अली अन खिशात दमडी ही नसल्याने, हे कुटुंब पुरते हतबल झाले. पैसाच नसल्याने ते ट्रॅक्टर तर सोडाच बैलाच्या साह्याने देखील शेती करण्यासाठी असमर्थ ठरले. तरीही त्यांनी या परिस्थितीला हार मानली नाही. कोरडवाहू असलेली दीड एकर शेतीदेखील परंडे कुटुंब मोठ्या जिद्दीने करत आहे. परिस्थितीसमोर हतबल झालेले परंडे कुटुंब कुणासमोर हात न पसरविता. वयाचे 65 वर्ष ओलांडले असताना ही, स्वतः व पुतण्याच्या खांद्यावर औताचे जू ठेऊन पत्नी जानकाबाई औत धरतात. एवढेच नव्हे तर, पांडुरंग परंडे यांचा भाऊ एक मंदबुद्धीचा आणि एक वयोवृद्ध असल्याने स्वतःची ऐपत नसतानाही ते दोन भावांच्या परिवारालाही दिलासा देतात.

शेतकरी हा खरोखरच निसर्गाच्या अवकृपेमुळे परिस्थितीला हतबल झाला आहे. बरेच जण तर या परिस्थितीला कंटाळून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. मात्र, गरिबीवर मात करत परिस्थितीशी झुंज देणारे हे ६५ वर्षीय पांडुरंग गंगाराम परंडे यांचे प्रयत्न खरोखरच हतबल झालेल्या शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहेत. शासनाकडून अपेक्षा आहे मात्र, शासन काहीच देईना, जे दुष्काळाचे पैसे आले होते ते देखील बँकेत परस्पर उचलले. त्यामुळे काहीच अपेक्षा नाही. अजून तीन मुलींचे लग्न बाकी आहे, दुष्काळ असा आहे. काय करावं काय नाही अजिबात सुचत नाही. कर्ज नसले तरी एकत्र कुटुंब असल्याने काही घडत नाही आणि चारा नसल्याने बैल जोडी पाळणेदेखील कठीण असल्याच्या व्यथा पांडुरंग परंडे मांडत होते.

Intro:दिवसेंदिवस शेतकरी परिस्थिती समोर हतबल होत चालला आहे. त्यातच पाऊस ही नाही अन वाढत्या महागाईने तर शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडलंय. अशा परिस्थितीत शेती करणे म्हणजे शेतकऱ्यांसमोर एक आव्हानच आहे. सर्वसामान्य शेतकरी तर या मध्ये चांगलाच भरडून चाललाय. व्यवसायाने कुंभार असलेला असाच एका अल्पभूधारक शेतकरी परिस्थिती समोर हतबल होऊन त्याने स्वतःचे आखे कुटुंबच औताला जुंपलेय. हे विदारक चित्र आहे वसमत तालुक्यातील हट्टा येथील एका शेतकरी कुटुंबाचे.

Body:पांडुरंग परंडे रा. हट्टा अस या शेतकऱ्याच नाव आहे. हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांचा पारंपारिक व्यवसाय हा कुंभार आहे. मात्र वर्षभर चालणारा कुंभार व्यवसाय आता सिजनावर येऊन ठेपलाय. त्यातही हाती काहीच उरत नसल्याने हा व्यवसाय आता बंद पडण्याच्या मार्गावर आहे. परंडे यांना एक मुलगा, पाच मुली, पत्नी असा परिवार आहे. पूर्वी माती पासून मटके बनवून ते गाढवाद्वारे गावोगाव भटकंती करून त्याची विक्री करत. मिळालेल्या उत्पन्नातून आपला उदरनिर्वाह चालयचा. मात्र दिवसेंदिवस मटक्याची मागणी घटत गेली. अन परंडे याची परिस्थिती हलाखीची बनत गेली, सणावारापुरताच हा कुंभार व्यवसाय होऊन बसलाय. त्यामुळे परंडे यांनी एक एक करत सर्व गाढव विकून टाकलीय. त्यामुळे या कुटुंबावर आज घडीला उपासमार येऊन ठेपलीय. अशाच त्यांच्याकडे असलेली दिड एकर शेती करण्याचा प्रश्न निर्माण झाला. पेरणी तोंडावर अली अन खिशात दमडी ही नसल्याने, हे कुटुंब पुरत हतबल झालं. पैसाच नसल्याने ते ट्रॅक्टर तर सोडाच बैलाच्या साह्याने देखील शेतीकरण्यासाठी असमर्थ ठरले. तरीही त्यांनी या परिस्थितीला हार मानली नाही. कोरड वाहू च असलेली दीडच् एकर शेती तरी देखील परंडे कुटुंब मोठ्या जिद्दीने शेती वाहतात. परिस्थिती समोर हतबल झालेले परंडे कुटुंब कुणासमोर हात न पसरविता. वयाचे 65 वर्ष ओलांडले असताना ही, स्वतः व पुतण्याच्या खांद्यावर औताचे जु घेऊन, पत्नी जानकाबाई ओत धरतात.

Conclusion:एवढेच नव्हे तर पांडुरंग परंडे यांचा भाऊ एक मंद अन एक वयोवृद्ध असल्याने स्वतःची ऐपत नसतानाही त्यांच्या सख्ख्या दोन भावांच्या परिवारालाही दिलासा दिलाय. शेतकरी हा खरोखरच निसर्गाच्या अवकृपेमुळे परिस्थितीला हतबल झाला आहे बरेच जण तर या परिस्थितीला कंटाळून आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलतात . मात्र गरिबीवर मात करत परिस्थितीशी झुंज देणारे हे ६५ वर्षीय पांडुरंग गंगाराम परंडे यांचे प्रयत्न खरोखरच हतबल झालेल्या शेतकऱ्यांसाठी पेरणादायी आहेत. शासनाकडून अपेक्षा आहे मात्र शासन काहीच देईना, जे दुष्काळी चे पैसे आले होते ते देखील बँकेत परस्पर उचलले. त्यामुळे काही अपेक्षा नाही, बैल जोडीची अपेक्षा आहे. यासाठी सरकार माय बाप झाले तर प्रश्न सुटेल, अजून तीन मुलींचे लग्न बाकी आहे, दुष्काळ असा आहे. काय करावं काय नाही अजिबात सुचत नाही. कर्ज नसले तरी एकत्र कुटुंब असल्याने काही घडलं नाहि. अन चारा बी नसल्याने बैल जोडी पाळणे कठीण असल्याच्या व्यथा पांडुरंग परंडे मांडत होते.
Last Updated : Jul 9, 2019, 12:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.