ETV Bharat / state

हिंगोलीत पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या - बासंबा पोलीस

शेतातून जाऊन येतो, असे सांगून 'ते' आपल्या शेताकडे निघून गेले. मात्र, बराच वेळ होऊनही घरी परतले नाहीत. त्यामुळे घरातील सदस्यांनी त्यांचा शोध घेतला असता त्यांनी आत्महत्या केल्याचे दिसून आले.

policeman Suicided hingoli
पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
author img

By

Published : Feb 14, 2020, 6:16 AM IST

हिंगोली - तालुक्यातील ईसापुर रमना येथे पोलीस कर्मचारी केशव वानखेडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलीस कर्मचाऱ्याने अचानक आत्महत्या केल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. वानखेड यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजु शकले नाही.

हेही वाचा... मुंबई-लातूर-बिदर एक्सप्रेसमध्ये मारहाण; अत्यंविधीला जाणाऱ्या तरुणाचा जागीच मृत्यू

वानखेडे हे मुंबईतील पनवेल येथील पोलीस स्टेशनवर कार्यरत होते. दोन दिवसांपूर्वी ते आपल्या इसापूर रमना या गावी आले होते. शेतातून जाऊन येतो असे सांगून ते आपल्या शेताकडे निघून गेले. मात्र, बराच वेळ होऊनही ते घरी परतले नाहीत म्हणून घरातील सदस्यांनी त्यांचा शोध घेतला असता, त्यांनी आत्महत्या केल्याचे दिसून आले.

नातेवाईकांनी शेतात जाऊन शोध घेतला तेव्हा वानखेडे यांनी शेतातील झाडाला गळफास घेतल्याचे आढळून आले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच बासंबा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला. वानखेड यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.