हिंगोली - जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने जोरदार हजेरी लावली. सेनगाव तालुक्यातील देऊळगाव जहागीर येथे वीज पडून बैलाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास घडली. ऐन रब्बी हंगामातील पेरणीच्या तोंडावर बैल दगावल्याने शेतकऱ्याचे ४० ते ५० हजार रूपाचे नुकसान झाले आहे.
देऊळगाव जहागीर येथील शिवाजी सरगड नेहमी प्रमाणे झाडाला बैल बांधून शेतात झेंडूची फुले तोडण्याचे काम करीत होते. यावेळी अचानक विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. दरम्यान, झाडावर वीज पडली असता झाडाखाली बांधलेला बैल दगावला. तर दुसरा बैल थोडक्यात वाचला.
हेही वाचा - दारू पिऊन भरधाव वेगाने वाहन चालविणाऱ्यास वाहतूक शाखेचा दणका
खरीप हंगाम आता अंतिम टप्यात असल्याने, बरेच शेतकरी आता रब्बीच्या तयारीला लागले आहेत. मात्र, याचवेळी शेतकऱ्यावर नैसर्गिक आपत्तीचे संकट कोसळल्याने शेतकऱ्यांतुन हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा - विद्यार्थ्यांसमोरच शिक्षक अन् मुख्यध्यापिकेत झटापट; शिक्षकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल